Join us  

सोने ४४,५००, तर चांदी ४८ हजार रुपयांवर; भाव पुन्हा वधारले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2020 4:46 AM

सोने प्रतितोळा ४४ हजार ५०० रुपयांवर पोहचले. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ४८ हजार रुपये प्रती किलो झाली आहे.

जळगाव : भारतीय रुपयात सातत्याने होत असलेल्या घसरणीसह कोरोनामुळे अस्थिर झालेल्या जागतिक बाजारपेठेमुळे सोने-चांदीमध्ये गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे यांचे भाव पुन्हा वधारत आहेत. शुक्रवारी सोन्याने ऐतिहासिक उच्चांक गाठला. सोने प्रतितोळा ४४ हजार ५०० रुपयांवर पोहचले. चांदीच्याही भावात एक हजार रुपयांनी वाढ होऊन ती ४८ हजार रुपये प्रती किलो झाली आहे.कोरोना व्हायरसमुळे बाजारातील घसरण सुरू असून, अमेरिकन डॉलरचे दर वाढत आहेत. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात घसरण होत असल्याने सोने-चांदीचे भाव वाढतच आहे. यात भरात भर म्हणजे मुंबई शेअर बाजार तसेच विदेशातील शेअर बाजारात सातत्याने घसरण होत असल्याने अमेरिका, जपान, इंग्लंड या प्रमुख देशांसह भारतातही सोन्यामध्ये गुंतवणुकीकडे कल वाढत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.>आठवड्याच्यानंतर पुन्हा तेजी१२ फेब्रुवारीपासून भाव वाढत गेलेल्या सोन्याने २२ रोजी ४३ हजाराचा टप्पा गाठला. ४ मार्च रोजी मात्र त्यात थेट एक हजार ३०० रुपयांनी वाढ होऊन ते ४३ हजार ८०० रुपयांवर पोहचले.>चांदीलाही झळाळी२७ फेब्रुवारीला दीड हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ४७ हजार ५०० रुपये व २९ फेब्रुवारीला अडीच हजार रुपयांनी घसरण होऊन ४५ हजार प्रतिकिलो झाली. ४ मार्चला एकाच दिवसात ती दोन हजारांनी वाढून ४७ हजारावर पोहचली.आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीला मागणी वाढली आहे. रुपया व शेअर बाजारतही घसरण होत असल्याने यात गुंतवणूक वाढून त्यांचे भाव वाढत आहे.- मनोहर पाटील, जनसंपर्क अधिकारी, सुवर्ण पेढी, जळगाव.

टॅग्स :सोनं