Join us  

Gold Rates Today: तीन दिवसांच्या वाढीनंतर सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचे दर

By हेमंत बावकर | Published: October 22, 2020 11:50 AM

Gold, Silver Rates Today: 7 ऑगस्ट 2020 या दिवशी सोन्या-चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी त्यांचा उच्चांक गाठला होता.

सोन्य़ाच्या दरात बुधवारी वाढ (Gold Price Surge) पहायला मिळाली होती. 51333 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेल्या सोन्य़ाच्या वायदा बाजारात आज 263 रुपयांची घसरण नोंदविली गेली आहे. बाजार उघडताना सोन्यामध्ये 134 रुपयांची घरसण झाली होती. तर चांदीच्या दरातही   695 रुपयांची घसरण नोंदविली गेली आहे. 

सोन्याच्या दरात घसरण वाढतच चालली आहे. सोन्याने आज 51064 रुपयांचा कमाल स्तर गाठला होता. बाजारात मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांनी सोन्याची विक्री करण्यास सुरुवात केली. यामुळे सोन्य़ाच्या 4 डिसेंबरच्या वायदा बाजारात घसरण झाली. सध्या सोन्याचा वायदा भाव 51333 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 14,125 लॉटसाठी व्यवहार करण्यात आला. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात 0.48 टक्के वाढ झाली होती. यामुळे सोने प्रति औंस 1,924.50 डॉलरवर गेले होते. 

आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाचे अवमुल्यन झाल्याने बुधवारी सोन्याच्या दरात 512 रुपयांची वाढ झाली होती.  एचडीएफसी सिक्योरिटीजने ही माहिती दिली. तर चांदीदेखील 1,448 रुपयांच्या वाढीसह 64,015 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. मंगळवारी चांदीचा दर 62,567 रुपये होता. बुधवारी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 73.58 वर होता. 

Old Is Gold: खबरदार, जुने सोने विकायला जाल तर! जीएसटी भरावा लागण्याची शक्यता

सोन्याच्या दरांत झालेली घसरणउत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. परंतु मागणी नसल्याने सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) वाढ होत नाहीय. गेल्या आठवड्यात शुक्रवारी सोन्याचे दर (Gold Price Today) प्रति 10 ग्रॅम 50,653 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. चांदीदेखील 61,512 रुपये प्रति किलो (Silver Price Today) च्या पातळीवर बंद झाली. गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या भावात जोरदार चढ-उतार दिसून आले. सोन्याचे आताचे दर सर्वकालीन उच्च दरापेक्षा प्रति 10 ग्रॅम सुमारे 5500 रुपयांनी स्वस्त (Gold price fall) झाले आहेत. तर दुसरीकडे चांदीच्या किंमतीत प्रति किलो (Silver Price Fall)  सुमारे 16000 रुपयांनी घसरण झाली आहे.

7 ऑगस्ट 2020 या दिवशी सोन्या-चांदीच्या दराने आतापर्यंतची सर्वाधिक किंमत गाठली होती. सोने आणि चांदी या दोन्ही धातूंनी त्यांचा उच्चांक गाठला होता. सोन्याने प्रति १० ग्रॅम, 56,२०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली, तर चांदी प्रति किलोला  77,8400 रुपयांवर पोहोचली होती. यानंतर सोन्यामध्ये आतापर्यंत प्रति ग्रॅम 5547 रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी प्रति किलो 15,844 रुपयांनी खाली आली आहे.

बाजारातील मागणी कमी झाल्याने व्यापाऱ्यांनी व्य़वहारही कमी केले आहेत. यामुळे वायदा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात 0.09 टक्क्यांची घट झाली. सोने 50,665 रुपये प्रति 10 ग्रॅम राहिले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरचा सोन्याचा वायदा भाव 47 रुपयांनी घटला होता. याबाबत 14,585 लॉटमध्ये व्यापार झाला. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.10 टक्क्यांनी वधारून ते 1,910.90 डॉलर प्रति औंस झाले.

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजचांदी