Join us  

Gold Rates Today: लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 5:26 PM

Gold Price ( Gold Rate On 26 February 2020 ) : डॉलरच्या तुलनेत रुपया चांगली कामगिरी करत असल्यानं सोन्याच्या भाव पडले आहेत.

ठळक मुद्देलागोपाठ दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया चांगली कामगिरी करत असल्यानं सोन्याच्या भाव पडले आहेत.बुधवारी दिल्लीतल्या सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याचा भावात 62 रुपयांची कमी आली आहे.

नवी दिल्लीः लागोपाठ दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण आली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया चांगली कामगिरी करत असल्यानं सोन्याच्या भाव पडले आहेत. बुधवारी दिल्लीतल्या सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याचा भावात 62 रुपयांची कमी आली आहे. कोरोना व्हायरसचाही सोन्याच्या दरांवर प्रभाव पडला आहे. तर चांदीच्या किमतीतही कपात आली आहे. बुधवारी एक किलोग्रॅम चांदीची किंमत 828 रुपयांनी पडली असून, मंगळवारी सोन्याच्या दरातही कपात आली होती. सोन्याच्या दरात 584 रुपयांची घसरण झाली आहे, त्यामुळे प्रतितोळा 42 हजार 936 रुपयांवर सोन्याचे भाव आले आहेत.  वायदे बाजारात (एमसीएक्स) सोन्याचे दर 1.34 टक्क्यांनी - म्हणजेच 584 रुपयांनी घसरले. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याची किंमत 42,996 रुपयांवर आली आहे. गेले पाच दिवस वायदे बाजारात सोन्याचे दर वधारत गेले होते आणि त्यांनी नवा उच्चांक गाठला होता. सोन्याचा एक तोळ्याचा भाव 43,788 रुपयांवर जाऊन पोहोचला होता. त्यात आज काहीशी घसरण पाहायला मिळाली. चांदीचे दरही 1.6 टक्क्यांनी घसरले असून वायदे बाजारात एक किलो चांदीची किंमत 48,580 रुपये आहे. सोन्याची नवी किंमत (Gold Rate on 26th February 2020)- दिल्लीतल्या सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात कपात आली आहे. सोन्याचे दर पडून 43,502 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. मंगळवारी सोन्याचे दर 43,564 रुपये प्रति 10 ग्रामवर पोहोचले आहेत. चांदीची नवी किंमत(Silver Rate on 26th February 2020)- बुधवारी दिल्लीतल्या सराफा बाजारात चांदीच्या किमतीत कपात आली असून, दर प्रतिकिलोग्राम 48,146 रुपयांवर आली आहे. मंगळवारी चांदीची 48,974 रुपये प्रति किलोग्राम भावानं उतरली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1,684 डॉलर प्रति औंस आणि चांदी 18.10 डॉलर प्रति औंसवर काम करत आहे. म्हणून आली सोने-चांदीच्या दरात कपात- एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कॉमोटिडिज) तपन पटेल म्हणाले, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाल्यानं सोनं स्वस्त झालं आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 20 पैशांनी मजबूत झाला आहे. त्यामुळेच सोने-चांदीच्या दरात कपात आली आहे.  

टॅग्स :सोनं