Join us  

Gold Rates: सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी वाढ; जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 3:34 PM

Gold Rates, Silver Rates Today: जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट नोंदविली गेली. मजबूत असलेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजबाबतची अनिश्चिततेने सोन्यावर दबाव टाकला.

आज भारतीय बाजारात सोन्याच्या (Gold Rates) चांदीच्या (Silver) किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदविली गेली. एमसीएक्सवर (MCX) डिसेंबरच्या वायदा बाजारात सोने 252 रुपयांनी वाढून प्रति तोळा 51142 रुपयांवर गेले आहे. सोन्याच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. तर चांदीची वायदा किंमत 436 रुपयांनी वाढून 64122 प्रति किलोवर गेली आहे. 

जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीमध्ये घट नोंदविली गेली. मजबूत असलेला अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी प्रोत्साहन पॅकेजबाबतची अनिश्चिततेने सोन्यावर दबाव टाकला. सुरुवातीच्या सत्रामध्ये 1932.96 डॉलरवर गेलेल्या सोन्याने 0.2 टक्के घट नोंदवत 1,925.29 डॉलर प्रति औंसवर आले. डॉलरमध्ये 0.7 टक्क्यांची वाढ झाल्याने अन्य चलनांच्या देशांसाठी सोने महाग झाले. 

अमेरिकेच्या प्रोत्साहन पॅकेजवर अनिश्चितता कायम आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि हाऊस स्पीकर नॅन्सी पॅलोसी यांच्यामध्ये प्रगती खुंटल्यावरून जबाबदार कोण, असा वाद सुरु आहे. दोघेही एकमेकांना दोषी ठरवत आहेत. चांदी 0.4 टक्क्यांनी घटली. तर प्लॅटिनम 1 टक्के घटून 876.80 डॉलरवर आले होते. पैलेडियम 0.2 टक्के घटून 2,435.35 डॉलरवर आले होते. 

एमसीएक्स आणि लोकल दर वेगवेगळे का? चंद्रशेखर टिळक म्हणतात, होलसेल प्राइज इंडेक्स आणि रिटेल प्राइज इंडेक्स असतो, त्यामुळेच हे दर वेगवेगळे असतात. एमसीक्सवर जे दर असतात, तिथे आपल्याला सोन्याची डिलेव्हरी मिळत नाही. कॅमॉडिटी मार्केटचा जो रेट आहे, त्यानुसार तिथून आपण डिलिव्हरी घेतो. त्यामुळे हे दर वेगवेगळे असतात

सोनं १० ग्रॅम म्हणजे १ तोळा हे कसं ठरलं?टिळक म्हणतात, १ तोळा सोनं हे १० ग्रॅम दशमान पद्धतीत बसवणं सोपं जातं. अख्ख्या जगात तशीच पद्धत आहे. १ किलो म्हणजे १००० ग्रॅम असते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर निश्चित करणं सोयीस्कर ठरतं, असंही चंद्रशेखर टिळक म्हणाले आहेत.  

यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांना विचारलं असता, ते म्हणाले, दोन वर्षांसाठी जर सोन्यात गुंतवणूक केली, तर ती फायदेशीर ठरू शकते. खरेदी आणि विक्रीत प्रत्येक दुकानदाराला मार्जिन ठेवावं लागतं. आज भाव ५१,५०० आहे, जर तुम्ही १०० ग्रॅम सोनं घेतलंत तर त्याचे होतात ५ लाख १५ हजार. हेच जर दोन महिन्यांनी सोनं विकायला आणल्यास ज्वेलर्स हा प्रॉफिट मार्जिन आणि खरेदी-विक्री मार्जिन ठेवूनच विकत घेतो. खऱ्या सोन्यात घट नसते, त्यात बाइंग-सेलिंग मार्जिन असते. डॉलर आणि रुपये असा त्यात फरक असतो, ज्वेलर्स आणि डिलर्स हे दोन प्रकार असतात. डिलर्सकडून सोनं घेतल्यानंतर त्याचे भाव वाढतात, म्हणून एमसीएक्स आणि स्थानिक दरांमध्ये तफावत आढळून येत असते. तसेच जीएसटी लागल्यानं दरांमध्ये फरक पडत असल्याचं सुवर्ण व्यावसायिक पराग पेठे यांनी सांगितलं आहे. मोदी सरकारच्या सॉवरेन गोल्ड बाँड(Sovereign Gold Bond) योजनेंबद्दल विचारले असता ते म्हणाले, आपण उद्याचं नाही सांगू शकत तर सात वर्षं कोण थांबणार, दीर्घकाळासाठी ही योजना फायदेशीर असली तरी कोणीही एवढ्या काळासाठी गुंतवणूक करत नाही.  

टॅग्स :सोनंचांदी