Join us  

Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा बदलले; जाणून घ्या आजचा दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:34 PM

बुधवारी सोने 51626च्या किमतीवर बंद झाले, तर आज ते 51785च्या किमतीवर उघडले.

एमसीएक्सवर काल ऑक्टोबर डिलिव्हरी सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 51453 रुपयांवर बंद झाले आणि आज ते 106 रुपयांच्या वाढीसह 51559 रुपयांवर उघडले. सुरुवातीच्या व्यापारात सोन्याचा भाव कमीतकमी 51483 रुपये आणि 51644 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. त्याचप्रमाणे डिसेंबर डिलिव्हरीचे सोनेही जोरदार उघडले. बुधवारी सोने 51626च्या किमतीवर बंद झाले, तर आज ते 51785च्या किमतीवर उघडले.सोने 608 रुपये, चांदी 1,214 रुपयांनी वाढलीआंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सराफा बाजारात सोन्याचे भावही गुरुवारी 608 रुपयांनी घसरले, तर चांदीही 1,214 रुपयांनी घसरली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते सोन्याचे भाव 608 रुपयांनी घसरून 52,463 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदी 1,214 रुपयांनी घसरून 69,242 रुपये प्रति किलो झाली. मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 53,071 रुपये आणि चांदी 70,456 रुपये प्रतिकिलो होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1,943.80 डॉलर आणि चांदीचा भाव 26.83 डॉलर प्रति औंस झाला.मागणी घटल्यामुळे सोन्याचे वायदा दर कमीस्पॉट मार्केटमधील सोन्याची मागणी कमी असल्याने सट्टेबाजांमध्ये विक्रीत फार उत्साह नव्हता. गुरुवारी वायदा बाजारातील सोन्याचे दर 0.79 टक्क्यांनी घसरून 51,420 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले. एमसीएक्सवरील फ्युचर्स दरामध्ये सोन्याचे वायदा 404 रुपये किंवा 0.78 टक्क्यांनी घसरून 51,420 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यासाठी 10,142 लॉटची उलाढाल झाली. त्याचप्रमाणे डिसेंबरमध्ये डिलीव्हरी   रेटमध्ये 8,192 लॉटच्या व्यवहारात किंमत 393 रुपये किंवा 0.76 टक्क्यांनी घसरून 51,595 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर 1.09 टक्क्यांनी घसरून 1,949.10 डॉलर प्रति औंस झाले.यावेळी सणाच्या हंगामात मागणी कमी होणारसाधारणत: ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. उत्सवाच्या हंगामाचे आगमन हे त्याचे कारण आहे. दिवाळी जवळ नेहमीच सोने चमकत असते, परंतु कोरोनामुळे लोक आता आर्थिक संकटाला तोंड देत आहेत, त्याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होतो. मुंबईच्या एका सोने विक्रेत्याने सांगितले की, या वेळी सणासुदीच्या काळातही किमती कमी राहतील, अशी अपेक्षा आहे. कारण किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोना काळातील सोनं एक वरदान सोने ही कठीण संकटात वापरली जाणारी एक संपत्ती आहे, सध्याच्या कठीण जागतिक परिस्थितीत ही धारणा पुन्हा एकदा योग्य सिद्ध झाली आहे. कोरोना साथीच्या आणि भौगोलिक राजनैतिक संकटादरम्यान, सोने पुन्हा विक्रम नोंदवित आहे आणि इतर संपत्तीपेक्षा गुंतवणूकदारांसाठी सोने एक चांगला गुंतवणुकीचा पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. सोन्याच्या भावात चढ-उतार असताना किमान दीड वर्षांपर्यंत सोन्याचे दर चढेच राहतील, असे विश्लेषकांचे मत आहे. दिल्ली बुलियन अँड ज्वेलर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विमल गोयल यांच्या मते, किमान एक वर्ष तरी सोनं उच्च पातळीवर राहील. संकटाच्या वेळी गुंतवणूकदारांसाठी सोनं वरदान आहे. गोयल यांना असा विश्वास आहे की, दिवाळीच्या सुमारास सोन्यात 10 ते 15 टक्क्यांनी वाढ होऊ शकते.

सोन्यातली गुंतवणूक फायदेशीर आहे का?ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक म्हणतात, सोन्यातील गुंतवणूक ही अजिबात फायदेशीर नाही, कारण सोन्याचे भाव वाढले तरी आपण सोनं काही विकायला जात नाही. नुसते कागदोपत्री भाव वाढून त्याचा काहीही उपयोग नाही, त्यामुळे देशाचंही नुकसान होतं आणि आपलंही नुकसान होतं. तसेच घेतलेलं सोनं विकायला गेल्यानंतर सोनार त्यात काही ना काही घट काढतो, त्यामुळे आपलं नुकसान होतंच. सोन्याचे कागदोपत्री भाव जरूर वाढतात, ते नाकारता येत नाही. पण त्यातून आपल्या हाती किती फायदा येतो, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूकदारही सोनं विकत घेतात, पण ते विकत नाही, त्यामुळे त्यातून काहीच फायदा होत नाही. सोन्याचे दर जरी वाढत असले तरी सोनं कोणीही विकत नाही. त्यामुळे काहीही फायदा होत नाही. मात्र, आपण जर बाजारभावाचा उपयोग करून सोनं घेणार असू तर सोन्यासारखी फायदेशीर गुंतवणूक नाही हे मान्य!

कसा ठरतो सोन्याचा भाव?डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला आहे, तर दुसरीकडे कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.

टॅग्स :सोनं