Join us  

Gold Rate Today : लग्न सराईत सोनं झालं स्वस्त, चांदी महागली; जाणून घ्या आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 1:35 PM

आज सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. मात्र, चांदीचे दर वाढले आहेत.

सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. यातच सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सराफा बाजारात सोने स्वस्त झाले आहे. मात्र, चांदीचे दर वाढले आहेत.

सराफा बाजारात 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 226 रुपयांनी स्वस्त होऊन 51851 रुपयांवर आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात 344 रुपयांची वाढ झाली असून, चांदीचा दर 65510 रुपये किलोवर पोहोचला आहे. सोन्याचा दर ऑल टाईम हाय 56254 रुपयांवरून, 4275 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. तर, चांदी दोनवर्षांपूर्वीच्या आपल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत प्रती किलो 10490 रुपयांनी स्वस्त आहे.

इंडिया बुलियन्स असोसिएशनने जारी केलेल्या स्पॉट रेटनुसार आज सराफा बाजारात 24 कॅरेट सोने 3 टक्के जीएसटीसह 53406 रुपये प्रती 10 ग्रॅम आहे. तर, जीएसटीसह चांदीचा दर 67475 रुपये प्रती किलो असा आहे.

जीएसटीसह 18 कॅरेट सोन्याचा दर -  18 कॅरेट सोन्याचा दर आता 3888 रुपये एवढा आहे. 3 टक्के GST सह, तो 40054 रुपये प्रती 10 ग्रॅम असेल. याशिवाय, 14 कॅरेट सोन्याचा दर 30,333 रुपये प्रति 10 ग्रॅम असून. GST सह, ते 31242 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल.

23 कॅरेट सोन्याचा दर - 23 कॅरेट सोन्याचा विचार करता, आज बाजारात हे प्रति 10 ग्रॅम 51643 रुपये दराने खुले झाले. यावरही 3 टक्के जीएसटी स्वतंत्रपणे आकारला जाईल म्हणजेच आपल्याला हे प्रति 10 ग्रॅम 53192 रुपयांना मिळेल. याच बरोबर दागिने बनवण्याची मजुरी आणि ज्वेलर्सचा नफा वेगळा आसेल. याच वेळी, 22 कॅरेट सोन्याचा दर 47496 रुपये प्रति 10 ग्रॅमवर खुला झाला. 3टक्के GST सह, याची किंमत 48920 रुपये असेल. याच बरोबर दागिने बनवण्याची मजुरी आणि ज्वेलर्सचा नफा वेगळा आसेल.  

टॅग्स :सोनंबाजारचांदी