Join us  

Gold Rate Today: सोन्याच्या दरात 4000 रुपयांची मोठी घसरण, चांदीसुद्धा १२ हजार रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 1:26 PM

कोरोनाच्या संकटात गुंतवणूक वाढून भावही वाढलेल्या सोने-चांदीच्या भावात कोरोनाच्या लशीची घोषणा होताच मोठी घसरण झाली आहे.

सोन्याच्या दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याचे दर ४ हजार रुपयांनी घसरून ५१, ७०० रुपयांवर आले आहेत, तर चांदीतही १२०० रुपयांची घसरण झाली आहे. कोरोनाच्या संकटात गुंतवणूक वाढून भावही वाढलेल्या सोने-चांदीच्या भावात कोरोनाच्या लशीची घोषणा होताच मोठी घसरण झाली आहे.रशियाने लशीचा दावा करताच खरेदीदारांनी विक्रीचा मारा सुरू केला व आंतरराष्ट्रीय बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. यामुळे चांदीत एकाच दिवसात तब्बल बारा हजार रुपये तर सोन्यात चार हजार रुपयांनी घसरण झाली. परिणामी चांदी थेट ६३, ५०० रुपये प्रति किलोवर आली, तर सोने ५१, ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.कोरोनाच्या संकटात सर्वत्र आर्थिक अडचणी ओढवल्या असताना सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीत मोठी गुंतवणूक वाढली आहे. परिणामी त्यांचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र आता रशियाने कोरोना लशीची घोषणा करताच सट्टा बाजारात खरेदीदारांनी वाढविलेली खरेदी थांबवून विक्रीचा मारा सुरू केला आहे. त्यामुळे मंगळवारी ७५,५०० रुपयांवर असलेल्या चांदीच्या भावात १२ हजार रुपयांनी घसरण होऊन ती बुधवारी ६३, ५०० रुपये प्रतिकिलोवर आली. अशाच प्रकारे मंगळवारी ५५,७०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात चार हजार रुपयांनी घसरण होऊन ते ५१,७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे.

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंज