Join us  

दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गगनाला भिडणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 12:03 PM

चांदीच्या दरातही वाढ झाली आहे.

मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने सोन्याच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा अंदाज सराफा बाजरात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आगामी तीन ते चार महिन्यामध्ये म्हणजेच दिवाळीपर्यंत सोन्याचे दर 34 हजार रुपये प्रतितोळा (दहा ग्रम)होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर आताच खरेदी करुन ठेवा. कालचा सोन्याचा भाव होता 31 हजार 800 रुपयांवर होता. आगामी काही दिवसांमध्ये ही किंमत 34 हजारांवर जाण्याची शक्यता आहे.  चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. इंडस्ट्रीयल यूनिट्स आणि नाणे उत्पादकांच्या मागणीनंतर चांदीचे दर 100 रुपयांनी वाढून 41 हजार 100 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. 

टॅग्स :सोनं