Join us  

Gold Price: सोन्याच्या दरात थोडी, चांदीमध्ये मोठी घट; जाणून घ्या सध्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 1:56 PM

Gold Price, Silver Price Today: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर चढेच होते. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी बहुमताने 900 अब्ज डॉलरच्या दिलासा पॅकेजवर सहमती दर्शविली आहे.

जागतिक बाजारातील संमिश्र चढउतारामुळे भारतातील सोन्याच्या वायदा बाजारात सकाळी तेजी पहायला मिळाली होती. रत चांदीमध्ये घट दिसली होती. एमसीक्सवर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीचे सोने सकाळी बाजार उघडताच 0.11 टक्क्यांनी वाढून  50,067 रुपये प्रति दहा ग्रॅम झाले होते. गेल्या पाच सत्रांमध्ये सोने 50000 ते 50500 रुपयांच्या दरम्यान ट्रेंड करत आहे. मात्र, दुपारी दीड वाजता सोन्याने 50000 च्या खाली उडी घेतली. यावेळी सोने 18 रुपयांनी घसरले होते. यावेळी सोने 49,991 रुपये प्रति १० ग्रॅम होते. 

तर सकाळी चांदीचा वायदा भाव 0.24 टक्क्यांनी घसरून 68,650 रुपये प्रति किलोग्रॅम झाला होता. आता चांदीच्या दरात 0.72 टक्के घट झाली असून 494.00 रुपयांनी चांदी घसरून 68817 रुपये प्रति किलो झाली आहे. एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्यामध्ये 20 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीमध्ये 397.00 रुपयांची घट झाली आहे. 

अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रोत्साहन पॅकेजला मंजुरी दिली आहे. यामुळे जागतिक बाजारात सोन्याचे दर चढेच होते. अमेरिकेच्या सिनेट सदस्यांनी बहुमताने 900 अब्ज डॉलरच्या दिलासा पॅकेजवर सहमती दर्शविली आहे. या पॅकेजचा वापर हा कोरोना महामारीमध्ये अडचणीत सापडलेले उद्योग, गरजू लोक आणि लसीकरणासाठी वापरला जाणार आहे. यामुळे सोन्य़ाचा दरही प्रभावित झाला असून 0.1 टक्क्यांनी वाढून 1,875.61 डॉलर प्रति औंस झाला आहे. 

चांदीचा दरही 1.3 टक्क्यांनी उसळला होता. तर प्लॅटिनमही 0.7 टक्के वाढले होते. चांदी 26.50 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 1,038.46 डॉलर आणि पॅलेडिअम 0.8  टक्के वाढून 2,342.79 डॉलर झाले होते. अमेरिकेच्या या निर्णयामुळे गुंतवणूकदारांनी आनंदाने व्यवहार केले. वॉल स्ट्रीटमध्ये तेजी आल्याने आशियाई बाजारांमध्येही हिरवा निशान दिसू लागला होता.  

2021 च्या सुरुवातीला 42000 वर येणार सोने; जाणून घ्या कारण...

कोरोना काळात सोन्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. भारतात ऑक्टोबर, नोव्हेंबर हा महिना सण, उत्सवांचा होता. यामुळे सोन्याच्या किंमती वाढण्याची शक्यता होती. मात्र, लॉकडाऊन आणि कोलमडलेली अर्थव्यवस्था यामुळे खरेदीदारांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली. यामुळे सोन्याची चमक अचानक गायब होऊ लागल्याचे दिसत आहे. नोव्हेंबरमध्ये सोने २६०० रुपयांहून स्वस्त झाले आहे. तर उच्चतम स्तरावरून सोने ४००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. 

Gold Rate: ब्रिटनच्या नव्या कोरोनाने सोन्याचे दर वाढायला प्रारंभ; पुन्हा रेकॉर्ड करणार?

ऑगस्टमध्ये सोने ५६३७९ रुपयांवर गेले होते. तेव्हा ते आणखी वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, रशियाची स्तुतनिक व्ही कोरोना लस येताच सोन्याने कच खाल्ली. या आठवड्यात सोन्याचा ४ डिसेंबरचा वायदा भाव ४८१०६ प्रति १० ग्रॅमवर आला. शेवटच्या दिवशी सोन्यामध्ये ४११ रुपयांची घट नोंदविली गेली. गुरुवारी सोने 48517 रुपयांच्या स्तरावर बंद झाले. हा दर सोन्याच्या उच्च पातळीपेक्षा 8200 रुपयांनी कमी आहे. नोव्हेंबर महिन्याचा विचार करता ३० ऑक्टोबरला सोन्याचा दर 50699 रुपये प्रति १० ग्रॅम होता. मात्र, ९ नोव्हेंबरला तो वाढून 52167 रुपये झाला होता. यानंतर तो कमी जास्त होत राहिला आणि २७ नोव्हेंबरला 48106 रुपये प्रति १० ग्रॅम झाला होता. ६ नोव्हेंबरचा विचार करता सोन्याच्या दरात 4000 रुपयांची घट झाली आहे. पुढे कोरोना लस येण्याची शक्यता असल्याने हा दर आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कारण गुंतवणूकदार आता सोन्यातून पैसा काढून घेऊ लागले आहेत. 

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजचांदी