Join us  

Gold Price: सोन्याचा दर पुन्हा घसरला; जाणून घ्या महाशिवरात्रीनंतरचा 10 ग्रॅमचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 11:04 AM

Gold Price Today: कोरोना जेव्हा ऐन बहरात होता तेव्हा सर्वच वस्तूंच्या किमती अधोदिशेने जात असताना सोन्याच्या किमतींनी उड्डाण घेतले होते. पार ५६ हजार रुपये तोळा, असा अगडबंब उच्चांकी दर सोन्याने पाहिला आणि सोने घेऊ इच्छिणाऱ्यांची दातखीळ बसली.

एकीकडे कोरोनाचा कहर वाढू लागला असताना सोन्याच्या दरात (Gold Price falling) घसरण होऊ लागली आहे. सोन्याची चमक हळूहळू ओसरू लागल्याची ही चिन्हे आहेत. गेल्या काही महिन्यांत सोन्याने १२ हजारांची घसरण नोंदविली आहे. महाशिवरात्रीनिमित्त गुरुवारी बंद असलेले मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) आज सकाळी 9.30 वाजता खुले झाले. शुक्रवारी बाजार उघडताच सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण झाली. (Gold price fall by 169 rs, silver fall by 435 rupees )

एमसीएक्स (MCX) वर शुक्रवारी एप्रिलच्या सोन्याच्या वायदा भावात 138 रुपयांची घट झाली. 9.30 वाजता हा भाव 44,741 रुपये प्रति ग्रॅमवर होता. बुधवारी बाजार बंद होताना सोन्याचा हा दर 44,879 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. सध्या एमसीएक्सवर 169 रुपयांनी प्रति तोळा घसरले आहे. 

सोन्या सारखीच चांदीमध्ये देखील घसरण सुरु आहे. एमसीएक्सवर शुक्रवारी चांदीच्या वायदा बाजारात 345 रुपयांची घसरण झाली. 9.30 वाजता चांदी 67,200 रुपये प्रति किलो वर खुली झाली होती. बुधवारी बाजार बंद होताना चांदीचा दर 67,545 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. सध्या चांदी 67160 वर ट्रेड करत आहे. 

सोने 22 टक्क्यांनी घसरण्याचे कारण काय? कोरोना जेव्हा ऐन बहरात होता तेव्हा सर्वच वस्तूंच्या किमती अधोदिशेने जात असताना सोन्याच्या किमतींनी उड्डाण घेतले होते. पार ५६ हजार रुपये तोळा, असा अगडबंब उच्चांकी दर सोन्याने पाहिला आणि सोने घेऊ इच्छिणाऱ्यांची दातखीळ बसली. पण कोरोनाचा बहर जसजसा ओसरू लागला तसतशा सोन्याच्या किमतीही घरंगळू लागल्या. काय कारण असेल, या मागे. जाणून घेऊ या...

तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून दरांत घट होण्याची ५ कारणे...

  • कोरोनावर प्रभावी लस आल्याने
  • जागतिक भांडवली बाजारांमध्ये तेजी आल्यामुळे
  • अमेरिकेत सरकारी बॉण्ड्सना मागणी वाढल्याने
  • अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत झाल्यामुळे
  • या सगळ्या गोष्टी जुळून आल्याने लोकांनी सोन्यातील गुंतवणूक काढून घेण्यास सुरुवात केली

 

सोन्यातील गुंतवणूक आणि मागणी

  1. सोन्याचे आकर्षण, म्हणून भारतात मागणीही मागणी
  2. अनेक जण सोन्याचे दागिने करून ठेवतात
  3. गुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी केले जाते
  4. दरवाढीमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली होती
  5. आता दर घसरणीमुळे पुन्हा मागणी वाढू लागली आहे
टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंजचांदी