Join us

पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 03:05 IST

जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारतात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात ४ टक्क्यांनी वाढली आहे.

नवी दिल्ली- जगातील सोन्याचा सर्वात मोठा आयातदार असलेल्या भारतात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सोन्याची आयात ४ टक्क्यांनी वाढली आहे. याचा परिणाम देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढण्यात होत आहे.एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांमध्ये १६.९६ अब्ज डॉलरच्या सोन्याची आयात करण्यात आली. विशेष म्हणजे, जून महिन्यापर्यंत भारतामध्ये होणारी सोन्याची आयात जवळपास बंदच होती. त्यानंतर मात्र सोन्याच्या आयातीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली दिसून आली आहे.डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरती किंमत आणि घसरत असलेला शेअर बाजार यामुळे सोन्यातील गुंतवणूक वाढत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र, या वाढीव आयातीमुळे देशाच्या चालू खात्यावरील तूट वाढत चालली आहे. याचा परिणाम अर्थसंकल्पीय तूट वाढण्यात होईल.

टॅग्स :सोनं