Join us  

डॉलर वधारल्याने सोने कडाडले!; दुष्काळातही लग्नसराईमुळे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 1:34 AM

रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने सोने कडालले आहे. आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे.

जळगाव : रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारल्याने व आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने सोने कडालले आहे. आठवडाभरात सोने ८०० रुपये प्रती तोळ््याने वाढून ३२ हजार ९०० रुपयांवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे अक्षय तृतीयेनंतर ही भाव वाढ झाली आहे. मार्चनंतर दोन महिन्यांनी सोने पुन्हा एकदा ३३ हजाराच्या उंबरठ्यावर आहे.एकीकडे दुष्काळ असला तरी लग्न सराईमुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे. चांदी आठवड्यापासून किलोमागे ३९ हजारांवर स्थिर आहे. गेल्या आठवड्यात ६९.६२ रुपये मूल्य असलेले डॉलरचे दर ७०.३५ रुपयांवर पोहचले आहेत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने १०० रुपयांनी कमी होऊन ३२ हजार १०० रुपयांवर आले होते. मात्र त्याच्या दुसऱ्या दिवसापासून दररोज भाववाढ होत आहे.अडीच महिन्यांत चांदीचे भाव थेट तीन हजार रुपये प्रती किलोने कमी झाले आहेत. चांदी ५ मे रोजी वाढून ३९ हजार रुपये प्रती किलोवर पोहोचली. तेव्हापासूने भाव कायम आहे.रुपयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलर वधारण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढले. लग्नसराईमुळे मागणी वाढत असल्याने सोन्याचे भाव वाढत आहे.- अजयकुमार ललवाणी,अध्यक्ष, जळगाव सराफ असोसिएशन

टॅग्स :सोनं