Join us  

सोने पुन्हा एकदा भडकले; चांदीतही अडीच हजार रुपयांची वाढ, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2020 5:39 PM

सोने-चांदीला वाढलेली मागणी व त्या प्रमाणात न होणारा पुरवठा या कारणांमुळे सोने-चांदीत सातत्याने भाव वाढ आहे.

नवी दिल्ली : सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून गुरुवारी पुन्हा सोन्याच्या भावात ६०० रुपयांनी वाढ होऊन सोन्याने ५६ हजारांचाही टप्पा ओलांडत ते ५६ हजार ४०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे. अशाच प्रकारे चांदीतही अडीच हजार रुपयांनी वाढ होऊन ती ७३ हजार ५०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे. सोने-चांदीला वाढलेली मागणी व त्या प्रमाणात न होणारा पुरवठा या कारणांमुळे सोने-चांदीत सातत्याने भाव वाढ आहे. याचाच सट्टा बाजारात फायदा घेतला जात असल्याने या भाववाढीत आणखी भर पडत असल्याचे गेल्या काही दिवसांपासून चित्र आहे. 

दोन दिवसात चांदी सहा हजारांनी वधारलीगेल्या महिन्यापासून सातत्याने वाढ होत असलेल्या सोन्या-चांदीत तर दोन दिवसात मोठे विक्रम झाले आहेत. मंगळवारी ६७ हजार ५०० रुपयांवर असलेल्या चांदीत बुधवारी साडेतीन हजाराने वाढ होऊन ती ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली. त्यानंतर सलग दुस-या दिवशी गुरुवारी त्यात आणखी अडीच हजार रुपये प्रति किलोने वाढ होऊन ती ७३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहचली.दोनच दिवसात चांदीत तब्बल सहा हजार रुपयांनी वाढ झाली आहे. अशाच प्रकारे सोन्यातही दोन दिवसात दीड हजार रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी ५४ हजार ९०० रुपये प्रति तोळ््यावर असलेल्या सोन्याच्या भावात बुधवारी ९०० रुपयांनी वाढ होऊन ते ५५ हजार ८०० रुपये प्रति तोळ््यावर पोहचले. त्यानंतर गुुरुवारी पुन्हा ६०० रुपयांनी वाढ होऊन ते ५६ हजार ४०० रुपये प्रति तोळा झाले.

टॅग्स :सोनंगोल्ड स्पॉट एक्स्चेंज