Join us  

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण; दर प्रति तोळा १२ हजार रुपयांनी झाला कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 12:27 PM

gold and silver rate today: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात घसरणविक्रमी किमतीच्या तुलनेत सोने सध्या १२ हजार रुपयांनी स्वस्तमुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील सोन्याचा दर पाहा

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या वाढीमुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली होती. अनेक सामान्य ग्राहकांना सण-उत्सव, लग्न-समारंभाच्या निमित्ताने सोने खरेदी करण्यासाठी खिसा मोठ्या प्रमाणावर रिकामा करावा लागत होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. (gold and silver rate today and price fall around 12 thousand rs of gold)

सोने खरेदीसाठी इच्छुक असलेल्या ग्राहकांसाठी सध्या सोन्याचा भाव १२ हजारांनी स्वस्त आहे. कोरोना लसीकरणाला सुरुवात, अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात केलेली कपात आणि भांडवली बाजारातील तेजी या घटकांमुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे सांगितले जात आहे. आताच्या घडीला बाजारात सोन्याचा भाव ४४ हजार रुपयांच्या आसपास आहे. ऑगस्ट २०२० मधील विक्रमी किमतीच्या तुलनेत सोने सध्या १२ हजार रुपयांनी स्वस्त आहे.

LIC IPO तून १ लाख कोटी व BPCL मधून ८० हजार कोटींची कमाई; केंद्र सरकारला विश्वास

सोने आणि चांदीमध्ये किंचित सुधारणा

सोमवारी धुलिवंदनाच्या निमित्ताने मल्टी कमॉडिटी बाजार बंद आहे. शेवटच्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये किंचित सुधारणा झाली. एमसीएक्सवर बाजार बंद होताना सोन्याचा भाव ४४,६५० रुपयांवर स्थिरावला. त्यात ४५ रुपयांची घसरण झाली. दिवसभरात सोन्याचा भाव ४४,४४१ रुपये इतका खाली आला होता. चांदीचा भावात १८५ रुपयांची घसरण होऊन तो, एक किलोसाठी ६४,६८४ रुपयांवर बंद झाला. 

मुंबईसह प्रमुख राज्यातील सोन्याचा दर

मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४२,९८० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ४३,९८० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,०७० रुपये झाला आहे. तर, २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८,०७० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२,२४० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६,०८० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४,२०० रुपये असून, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४६,९२० रुपये आहे. दरम्यान, ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५६,३०० रुपये प्रती १० ग्रॅम अशा विक्रमी पातळीवर गेले होते. चालू महिन्यात सोने १,८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

 

टॅग्स :सोनंचांदीव्यवसाय