Join us  

Gold-Silver Price Today: आज किती रुपयांनी स्वस्त झालं सोनं आणि चांदी? जाणून घ्या, आजचा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 2:34 PM

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय स्थरावर सोन्याचे दर वधारले आहेत.

नवी दिल्ली - जागतीक बाजारातील घसरणीनुसार, दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा दर 208 रुपये प्रती 10 ग्रॅमने स्वस्त झाला. तसेच चांदिच्या किंमतीत 1143 रुपये प्रती किलो ग्रॅमची घसरण झाली आहे. जर आपण सोनं आणि चांदी खरेदी करू इच्छित असाल तर जाणून घ्या, आजचा ताजा दर.

असे आहेत आजचे दर?इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनने जारी केलेल्या दरानुसार, भारतीय बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत आता 47 हजार 815 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तसेच 999 शुद्धता असलेल्या चांदीची किंमत 68 हजार 285 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे.

आंतरराष्ट्रीय स्थरावर सोन्याच्या दरात वाढ -एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ अॅनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय स्थरावर सोन्याचे दर वधारले आहेत. यामुळे शॉर्ट टर्म रेजिस्टेन्स 1,800 डॉलर प्रती औंसवर होता.

कसा ठरतो सोन्याचा दर? -कोरोना काळात लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला आहे. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.

लंडनमध्ये ठरवला जातो सोन्याचा दर - आता सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले १५ बँकर्स(बँका) एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. या १५ बँकांमध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटिया, स्टँडर्ड चार्टर्ड अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. इतर दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.

सोन्याचा भाव ठरवण्यात आयजीबेए म्हणजेच इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचा महत्त्वाचा हिस्सा असतो. या संघटनेचे सभासद भारतातील मोठे व्यापारी असतात. खरेदी आणि विक्री, असे दोन दर असतात त्या दरांची सरासरी काढून सोन्याचा भाव ठरवला जातो. सोने आपल्या बँका परदेशी बँकांकडून खरेदी करतात. त्याच्यावर त्यांचे सर्व्हिस चार्जेस लागतात आणि डिलर्सना विकतात. त्यानंतर डिलर्स ते सोन्याचे व्यापारी आणि दुकानदारांना विकतात. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय भाव आणि भारतातल्या भावात तफावत आढळून येते. 

टॅग्स :सोनंचांदीव्यवसायबाजार