Join us  

सोन्याचे भाव घसरले, चांदीच्याही भावात १२०० रुपयांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 5:32 AM

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सोने-चांदीच्या आवकवर परिणाम होऊन सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, आवकही सुरळीत होऊ लागली आहे.

जळगाव : गेल्या सात महिन्यांपासून कोरोनामुळे परिणाम झालेल्या सोने-चांदीची आवक आता सुरळीत होऊ लागल्याने त्यांचे भाव कमी होण्यासही मदत होत आहे. त्यामुळेच चांदीच्या भावात बाराशे रुपये प्रतिकिलोने घसरण होऊन ती ६३ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली तसेच सोन्याच्याही भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितोळ्यावर आले.

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने सोने-चांदीच्या आवकवर परिणाम होऊन सुवर्ण बाजारात अस्थिरता निर्माण झाली होती. मात्र आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, आवकही सुरळीत होऊ लागली आहे. त्यामुळे आता नवरात्र व सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीला मागणी वाढली असताना भाव कमी होत आहे. आवक पूर्ववत झाल्याने सोमवारी सुवर्ण बाजार उघडताच चांदीचे भाव एक हजार २०० रुपयांनी घसरून नको ती ६३ हजार ३०० रुपये प्रतिकिलोवर आली. तसेच सोन्याच्या आहे भावात ६०० रुपयांनी घसरण होऊन ते ५१ हजार रुपये प्रतितळ्यावर आले.

मागणी कायम -अधिकमासामुळे सोन्या-चांदीला चांगलीच मागणी वाढली. त्यात सोन्या-चांदीचे भाव कमी झाल्याने ग्राहकांची खरेदीला पसंती दिसून येत आहे. त्यामुळे सध्यादेखील नवरात्रोत्सवाच्या काळात सोने-चांदीला चांगली मागणी आहे. त्यात आता सणासुदीच्या काळातही मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. 

टॅग्स :सोनंचांदीबाजार