नवी दिल्ली : सोने दहा ग्रॅममागे सोमवारी येथील सराफ बाजारात १०० रुपयांनी स्वस्त होऊन ३५,४७० रुपये झाले. विदेशात मागणी मंदावल्याचा हा परिणाम होता. सोन्याच्या पावलावर पाऊल टाकून चांदीही किलोमागे २५ रुपयांनी स्वस्त होऊन ३९,१७५ रुपये झाली. नाणे निर्मात्यांकडून व औद्योगिक क्षेत्रातून मागणी कमी झाल्यामुळे चांदी नरमली. शनिवारी सोने १० ग्रॅममागे १७० रुपयांनी वधारले.
सोने १०० तर चांदी २५ रुपयांनी स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 04:23 IST