Join us

गो-एअर विमानाचे उड्डाण होईना, विमानतळावर प्रवासी ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 01:09 IST

गो-एअर विमान 3 तासांपासून गोव्यातील विमानतळावर उभे असल्याची तक्रार एका प्रवाशाने ट्विटरवरुन केली आहे.

पणजी - गो-एअर कंपनीचे विमान गोवा  href='http://www.lokmat.com/topics/airport/'>विमानतळावर उभे असल्याची तक्रार एका प्रवाशाने ट्विटरवरुन केली आहे. शुक्रवारी सायंकाळी 5.30 pm वाजता गो-एअरचे हे विमान 100 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणार होते. मात्र, 3 तासांनतरही विमानाने टेक ऑफ न केल्याने प्रवाशी चांगलेच वैतागले आहेत. तर रात्रभर प्रवाशांना विमानतळावर ताटकळत बसावे लागणे, हे लाजीरवाणे असल्याचेही एका ट्विटर युजरने म्हटले आहे. 

गो-एअर विमानाने आम्हाला गेल्या 3 तासांपासून पणजी विमानतळावर ताटकळत बसवले आहे. विमानातील 100 पेक्षा जास्त प्रवाशांना केवळ 2 समोसे देण्यात आले आहेत. त्यानंतर, इंधन भरण्यासाठी हे विमान पुन्हा विमानतळ परिसरात नेण्यात आले. पण, आम्हाला याबाबत कुठलिही कल्पना देण्यात आली नसल्याचे या विमानातील प्रवाशी तख्तार सिम्रीता यांनी ट्विट करुन म्हटले आहे. तसेच याबाबत विमानातील प्रवाशांच्या नातेवाईकांनी गो-एअरशी फोनद्वारे चौकशी केली. मात्र, हा जोक तर नाही ना, असा उलट सवालच गो-एअरकडून करण्यात आला. दरम्यान, या घटनेनंतर गो-एअरने ट्वीटरवरुनच संबंधित प्रवाशांची माफी मागितली आहे. 

   

टॅग्स :गो-एअरविमानतळगोवा