Join us  

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगातील शेअर बाजारांमध्ये पडझड; गुंतवणूकदार धास्तावले 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:01 PM

शेअर बाजार सेंटिमेंट्सवर चालतो. कोरोना सुरू झाला तेव्हा निफ्टीने २४ मार्च २०२० रोजी ७५११ हा तळ गाठला होता.  त्यानंतर बाजाराने एकतर्फी वाढ पाहिली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारात पैसे गुंतविले.

पुष्कर कुलकर्णी - मुंबई :शेअर बाजाराने शुक्रवारी जबरदस्त आपटी खाल्ली. सेन्सेक्स १६८७.९४ अंशांनी (२.८७ %) खाली येऊन ५७१०७.१५ वर तर निफ्टी ५०९.८० (२. ९१ %) ने खाली येऊन १७०२६. ४५ वर बंद झाला. जगाच्या काही भागात कोरोनाचा नविन विषाणू आढळून आल्याने शेअर बाजारात निर्माण झालेल्या भितीच्या वातावरणामुळे बाजारात विक्री वाढुन तो कोसळला.शेअर बाजार सेंटिमेंट्सवर चालतो. कोरोना सुरू झाला तेव्हा निफ्टीने २४ मार्च २०२० रोजी ७५११ हा तळ गाठला होता.  त्यानंतर बाजाराने एकतर्फी वाढ पाहिली. विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात बाजारात पैसे गुंतविले. निफ्टीने  १८ ऑक्टोबर २०२१ रोजी १८६०४ ही उच्चतम् पातळी ही गाठली.   त्यानंतर बाजारात करेक्शन येणे स्वाभाविक आहे आणि करेक्शनसाठी बाजारही कारणे शोधत असतो.  आज फक्त भारतीयच नव्हे, तर अमेरिकी, युरोपियन व आशियाई बाजारात मोठी पडझड झाली आहे. आगामी ख्रिसमसमुळे परकीय वित्तसंस्था विक्री करीत असल्याने बाजाराची घसरण वाढली आहे.

घसरणीची कारणे --  कोरोनाचा नवा विषाणू : कोरोनाचा नवीन विषाणू आल्याने जागतिक बाजारात पुन्हा भीतीचे वातावरण आहे. युरोपमधील काही देशांत पुन्हा लॉकडाऊन वा कडक निर्बंध लागू होत आहेत. अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पुन्हा लाॅकडाउनची भीती निर्माण झाली आहे.-  जागतिक बाजारात अस्थिरता  : जागतिक स्तरावर बाजार खाली येतात, तेव्हा त्याचे पडसाद भारतातही होतो. आज त्याचाच मोठा परिणाम झाला आहे.-  पोषक वातावरण नाही : दुसऱ्या तिमाही निकालानंतर आता डिसेंबर अखेरपर्यंत भारतीय बाजारास वाढीसाठी नवा ट्रिगर कोणताही नाही.-  विदेशी गुंतवणूकदारांची नफा वसुली : विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून नफा वसुली करून विक्रीचा दबाव वाढविला आहे.  त्यामुळे सेन्सेक्स व निफ्टी खाली येत आहेत.-  कमाॅडिटी मार्केटवर लक्ष - नफा वसुली बरोबरच ट्रेडर्स  कमॉडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत . मध्यंतरी सोन्याचा दर खाली आला होता. जागतिक शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे ट्रेडर्स सोन्यात गुंतवणूक करून ठेवणे अधिक पसंत करतात. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक