नवी दिल्ली : ग्राहकांना कर्ज देताना आक्रमकपणा नको आणि व्याजदर वाजवी ठेवा, असा इशारा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) दिला. एनबीएफसींनी रिझर्व्ह बँकेच्या कर्जवसुली नियमांचे काटेकोर पालन करावे. गरजेनुसार आणि परतफेडीच्या क्षमतेनुसारच ग्राहकांना कर्ज द्यावे. ग्राहकांच्या माथी जबरदस्तीने कर्ज मारू नका, असे त्यांनी ठणकावले.
एनबीएफसीचे कर्जही झाले स्वस्त; ग्राहकांना फायदा द्या
एनबीएफसी आता सावकारी पद्धतीत काम करणाऱ्या ‘शॅडो बँका’ राहिलेल्या नाहीत. त्यांचे कामकाज आता नियमनाखाली आहे. एनबीएफसींचे जाळे खूप मोठे आहे. त्यांचा फायदा परवडणाऱ्या घरबांधणी, एमएसएमई, ग्रीन प्रोजेक्ट्स यांसारख्या क्षेत्रांना द्यायला हवा. आरबीआयने एनबीएफसीसाठी कर्जदर कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. या निर्णयाचा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन केले आहे.
हिस्सा देशातील कर्जपुरवठ्यात त्यांचा आहे. ५० टक्क्यांपर्यंत हा हिस्सा नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. ९,००० एनबीएफसी म्हणजेच गैर-बँकिंग वित्तीय कंपन्या काम करत आहेत. ६.४ टक्क्यांवरून ३ टक्क्यांवर एनबीएफसीचे बुडीत कर्ज आले आहे.