Join us

दिग्गज कंपन्या करताहेत नाेकर भरतीत कंजुषी, २.४३ लाखांची झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 12:31 IST

अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये नोकर भरतीत १.५ टक्के वाढ दिसून आली.

नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये चांगला नफा होऊनही शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या मोठ्या व मध्यम कंपन्यांनी नोकर भरतीत कंजुषी केली आहे. त्यामुळे यंदा २.४३ लाख नोकऱ्या घटल्या आहेत.

बँक ऑफ बडोदाने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, सहा हजार सूचीबद्ध कंपन्यांपैकी १,१९६ कंपन्यांची आकडेवारी हाती आली आहे. या कंपन्यांनी वित्त वर्ष २०२३-२४ मध्ये ९०,८०० लोकांंना नोकऱ्या दिल्या आहेत. २०२२-२३ मध्ये ३.३४ लाख लोकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या. याचाच अर्थ २०२३-२४ मध्ये नोकऱ्यांत तब्बल २.४३ लाखांनी घट झाली आहे.

अहवालानुसार, २०२३-२४ मध्ये नोकर भरतीत १.५ टक्के वाढ दिसून आली. २०२२-२३ मध्ये ५.७ टक्के वाढ झाली होती. ही आकडेवारी कंपनीमध्ये पेरोलवर काम करणाऱ्या लोकांची आहे. रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश नाही. 

ऑनलाइनने दिले दीड काेटी राेजगारई-काॅमर्स क्षेत्रातून माेठ्या प्रमाणात राेजगार मिळत आहे. देशातील ऑनलाइन विक्रेत्यांनी १.५८ काेटी राेजगार दिले असून त्यात३५ लाख महिला आहेत.१७.६ लाख किरकाेट उद्याेगांची ई-काॅमर्स क्षेत्रात उलाढाल आहे. ‘भारतातील राेजगार आणि ग्राहक कल्याणावर ई-काॅमर्सचा प्रभाव’ या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. ‘‘पहले इंडिया फाउंडेशन’ या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.५४ टक्के जास्त लाेकांना राेजगार ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन विक्रेते देत आहेत.दुपटीपेक्षा जास्त राेजगार ऑनलाइन विक्रेते महिलांना देत आहेत.९ लाेकांना एक ई-काॅमर्स विक्रेता राेजगार देताे, त्यात दाेन महिलांचा समावेश आहे.६ लाेकांना एक ऑफलाइन विक्रेता राेजगार देताे. 

३.३४लाख नोकऱ्या २०२२-२३मध्ये या कंपन्यांनी दिल्या होत्या.

एकूण रोजगारात सर्वाधिक २५ टक्के हिस्सेदारी आयटी क्षेत्राची आहे. २२ टक्के हिस्सेदारीसह बँकिंग क्षेत्र दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर वित्त, आरोग्य आणि वाहन क्षेत्राचा क्रमांक लागतो.

क्षेत्र    वृद्धी दर (%)रिटेल    १९.४ट्रेडिंग    १६.२इन्फ्रा    १५.८रिअल्टी    १३.६

टॅग्स :नोकरीव्यवसाय