Join us  

Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरात बसून मिळतील 2 लाख रुपये, कसे ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2021 3:42 PM

paytm : अलीकडेच कंपनीने त्वरित वैयक्तिक कर्ज (instant personal loan) सेवा सुरू केली आहे.

ठळक मुद्देपेटीएम आपल्या लाखो युजर्संना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सोप्या अटींमध्ये देत आहे.

नवी दिल्ली : जर तुम्ही पेटीएम (Paytm) वापरत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. पेटीएमने आता आपल्या युजर्संसाठी उत्तम सुविधा उपलब्ध करत आहे. पेटीएम आपल्या युजर्संना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्ज (Loan) सुविधा देत आहे. दरम्यान, या कर्जाच्या सुविधेसाठी जास्त त्रास होणार नाही किंवा जास्तीची कोणतीही कागदपत्रे (डाक्युमेंट्स) लागणार नाहीत. (get rs 2 lakh loan from paytm in 2 minutes know how check process)  

पेटीएम आपल्या लाखो युजर्संना दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सोप्या अटींमध्ये देत आहे. अलीकडेच कंपनीने त्वरित वैयक्तिक कर्ज (instant personal loan) सेवा सुरू केली आहे. कंपनीने कर्जाच्या अर्जासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल केली आहे आणि यामध्ये बँकेची माहिती असणारी कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. युजर्स काही मिनिटांत कर्ज घेऊ शकतात. जाणून घ्या काय आहे प्रक्रिया?...

(Paytm Money आता सुरू करणार नवीन इनोव्हेशन सेंटर, अनेकांना मिळणार रोजगार )

घरात बसून मिळेल कर्जपेटीएम कर्जाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. कर्ज घेण्यासाठी ग्राहकांना घराबाहेर जावे लागणार नाही. तुम्ही आपल्या मोबाइलवरून कर्जासाठी घरीच अर्ज करू शकता. कर्ज मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया अवघ्या 2 मिनिटांवर आहे. प्रक्रियेच्या काही मिनिटांत बँक खात्यात पैसे जमा होतील.

कर्जासाठी कसा करावा अर्ज?त्वरित वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी ग्राहकाला पेटीएम अ‍ॅपवर जाऊन वित्तीय सेवा पर्यायातील 'पर्सनल लोन' टॅबवर क्लिक करून अर्ज करावा लागेल. यानंतर, तुमच्याकडून मागितलेली माहिती द्यावी लागेल. तुमची एलिजिबिलीटी दिसून येईल आणि त्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. पेटीएमने 400 हून अधिक ग्राहकांना वैयक्तिक कर्ज वितरित केले आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी 10 लाख लोकांना वैयक्तिक कर्ज देण्याचे लक्ष्य ठेवत आहे. 

टॅग्स :पे-टीएमबँकपैसा