नवी दिल्ली : तुमच्याकडे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाैंट असेल तर ही बातमी महत्त्वाची आहे. डिमॅट आणि ट्रेडिंग खातेदारांना ३१ जुलैपर्यंत केवायसी डिटेल्स अपडेट करण्याच्या सूचना डिपाॅझिटरीकडून देण्यात आल्या आहेत. तसे न केल्यास खाते डिॲक्टिव्हेट करण्यात येईल. नॅशनल सिक्याेरिटीज डिपाॅझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) आणि सेंट्रल डिपाॅझिटरी सर्व्हिसेस लिमिटेडने (सीडीएसएल) यावर्षी एप्रिलमध्ये सूचना जारी केल्या हाेत्या. त्यानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे.
आजच करा ‘केवायसी’ अपडेट; अन्यथा बंद हाेईल डिमॅट खाते
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 08:47 IST