Join us
Daily Top 2Weekly Top 5

दरमहा ४० रुपयांमध्ये घ्या २ लाखांचा विमा, काय आहे ‘पीएमजेजेबीवाय’ योजना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 09:21 IST

येत्या आठवडाभरात पाॅलिसी रिन्यू हाेणार आहे. यासंदर्भात माहिती घेऊ या.

नवी दिल्ली : केंद्र सरकारपंतप्रधान जीवन ज्याेती विमा याेजनेच्या (पीएमजेजेबीवाय)नावाने सर्वसामान्यांसाठी विमा याेजना राबविते. याेजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीचा काेणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास नाॅमिनीला किंवा कुटुंबीयांना २ लाख रुपये मिळतील.आजारपण किंवा अपघातात मृत्यू झाल्यास ही रक्कम देण्यात येते. येत्या आठवडाभरात पाॅलिसी रिन्यू हाेणार आहे. यासंदर्भात माहिती घेऊ या.

प्रीमियम किती?‘पीएमजेजेबीवाय’ याेजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक ४३६ रुपये प्रीमियम आहे. म्हणजे, दरमहा ४० रुपयांपेक्षाही कमी रकमेत २ लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते. ही रक्कम २५ ते ३१ मे या कालावधीत एकाच वेळी बॅंक खात्यातून वळती हाेते. यासाठी अर्जदाराला बॅंकेकडे पूर्वसंमती द्यावी लागते.

‘पीएमजेजेबीवाय’ ही एक टर्म विमा याेजना आहे.१ जून ते ३१ मे हा विमा संरक्षणाचा कालावधी आहे. अर्जदार भारतीय नागरिक हवा.अर्जदाराचे बॅंक खाते आवश्यक आहे.

दाव्याची रक्कम कशी मिळते?

  • ज्या कंपनीने विमा दिला आहे, ती कंपनी किंवा संबंधित बॅंकेकडे नाॅमिनीला संपर्क साधावा लागेल. मृत्यू प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.
  • १८ ते ५० वर्षांपर्यंत
  • वयाची काेणतीही व्यक्ती याेजनेचा लाभ घेऊ शकते.
टॅग्स :सरकारपंतप्रधान