Join us  

Mukesh Ambani vs Gautam Adani: अदानींना एका दिवसात ९३,०६५ कोटींचा झटका; शेअर बाजाराचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 4:30 PM

Mukesh Ambani vs Gautam Adani: दोनच दिवसांपूर्वी गौतम अदानी ही आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थच्या अगदी जवळ पोहोचले होते.

अदानी समुहाचे अध्यक्ष (Adani Group) गौतम अदानी (Gautam Adani) हे दोन दिवसांपूर्वी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याच्या जवळ पोहोचले होते. त्यांच्यात आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबनी (Reliance Industries Mukesh Ambani) यांच्या नेटवर्थमध्ये ०.६ अब्ज डॉलर्सचा फरक राहिला होता. परंतु शेअर बाजारात झालेल्या घसरणीमुळे अंबानी या रेसमध्ये पुढे निघून गेले आहे. दोघांच्या नेटवर्थमध्ये आता १३ अब्ज डॉलर्सचं अंतर झालं आहे.

दोन दिवसांपूर्वीच गौतम अदानी हे मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थच्या अगदी जवळ पोहोचले होते. परंतु शुक्रवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये १२.४ अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास ९३,०६५ कोटी रूपयांची घसरण झाली. यामुळे अदानी हे सध्या या रेसमध्ये मागे पडले आहेत.

Bloomberg Billionaires Index नुसार अदानी यांची नेटवर्थ आता ७८.१ अब्ज डॉलर्स इतकी राहिली आहे. तसंच जगातील श्रीमंतांच्या यादीत ते १३ व्या क्रमांकावर आहेत. यावर्षी त्यांच्या एकूण नेटवर्थमध्ये ४४.३ अब्ज डॉलर्सची तेजी आली आहे. Bloomberg Billionaires Index नुसार अंबनी यांचं नेटवर्थ ९१.१ अब्ज डॉलर्स आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अंबानी हे ११ व्या स्थानावर आहे. गुरूवारी रिलायन्सच्या शेअर्समध्ये ६.१० टक्क्यांची तेजी दिसून आली होती. परंतु शुक्रवारी झालेल्या घसरणीचा परिणाम रिलायन्सच्या शेअर्सवरही दिसून आला होता. कंपनीच्या शेअर्समध्ये ३.३ टक्क्यांमची घसरण झाली होती. यामुळे अंबनींच्या नेटवर्थमध्ये ३.६८ अब्ज डॉलर्सची घसरण झाली. तरीही सध्या ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कायम आहेत.

टॅग्स :मुकेश अंबानीअदानी