Join us  

Fuel Prices: इंधन दरानं सर्वच विक्रम मोडले, जयपूरमध्ये पेट्रोल 116, डिझेल 103 रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 3:12 PM

राजस्थानच्या सीमावर्ती भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त झाले आहेत. यामुळे येथील अनेक जिल्ह्यांतील लोक वाहनांमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी पंजाब आणि हरियाणामध्ये जात आहेत.

जयपूर - राजस्थानात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट पार कोलमडले आहे. राजधानी जयपूरमध्ये गेल्या दहा दिवसांत तब्बल सात वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. येथे गुरुवारी पेट्रोलची किंमत 116 रुपयांच्याही पुढे नोंदवली गेली. पेट्रोलची प्रीमियम गुणवत्ता 116.18 रुपये प्रती लिटर नोंदवली गेली. तर पेट्रोलची सामान्य गुणवत्ता 111.91 रुपये प्रति लीटर आहे. जयपूरमध्ये सध्या डिझेल 103.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या या वाढत्या किंमतींमुळे नागरीक प्रचंड त्रस्त झाले आहेत. जयपूरमधील लोक म्हणत आहेत, की इंधनांच्या किंमती वाढल्याने आम्ही कार ऐवजी, दुचाकी चालवायला सुरुवात केली आहे. इंधनाच्या प्रचंड भाव वाढीमुळे, जनतेच्या खिशावरील ताण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

राजस्थानच्या सीमावर्ती भागांत पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे लोक त्रस्त झाले आहेत. यामुळे येथील श्रीगंगानगरसह अनेक जिल्ह्यांतील लोक वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी पंजाब आणि हरियाणामध्ये जात आहेत. कारण तेथे इंधनांचे दर राजस्थानच्या तुलनेत कमी आहेत.

टॅग्स :पेट्रोलडिझेलइंधन दरवाढ