Join us  

इंधन, गॅस... आता कार व्यवसायात नशीब आजमावणार अंबानी, लंडनच्या 'या' कंपनीशी करणार डील?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 3:32 PM

ही मोठी कंपनी आपला काही हिस्सा विकण्याच्या विचारात आहे. यासाठी ते रिलायन्स इंडस्ट्रीजशीही चर्चा करत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि दिग्गज व्यावसायिक मुकेश अंबानी आता इंधन, गॅस आणि टेलिकॉम क्षेत्रानंतर कार व्यवसायात आपलं नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. नुकतीच त्यांनी लंडनच्या एका कंपनीशी करार केल्याची माहिती समोर आली आहे. लंडनची एमजी मोटर्स आपला काही हिस्सा विकण्याच्या विचारात आहेत. यासाठी ते रिलायन्स इंडस्ट्रीज, हीरो समूह, प्रेमजी इन्व्हेस्ट आणि जेएसडब्ल्यूशी चर्चा करत आहे.

माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत अंतिम करार होऊ शकतो. यासोबतच कार उत्पादन क्षेत्रातही मुकेश अंबांनी एन्ट्री होणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार एमजी मोटर्स भारतीय कंपन्यांशी हिस्सा खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचाही समावेश आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनी ही डील पूर्ण करू शकते. एमजी मोटर्सला आपल्या नव्या प्रकल्पासाठी निधीची गरज आहे. यासाठी कंपनी आपली काही शेअर्स विकून निधी जमा करण्याचं काम करणार आहे. एमजी मोटर्स ५ हजार कोटी रूपये जमवण्याच्या विचारात आहे.

मुकेश अंबानींची ऑटो सेक्टरमध्ये एन्ट्री

एमजी मोटर्ससोबत करार झाल्यानंतर रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची ऑटोमोबाईल क्षेत्रात एन्ट्री होणार आहे. या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत अंबानी आणि एमजी मोटर्समध्ये करार होऊ शकतो.

 

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्सएमजी मोटर्स