Join us  

1 मार्चपासून सामान्यांना झटका, सिलिंडरचे भाव वाढले अन्..; जाणून घ्या 'हे' 5 बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 6:39 PM

आज मार्च महीन्याच्या पहिल्या दिवशी सामान्य नागरिकांना झटका बसला आहे.

LPG Price Hike: आज, 1 मार्च 2024 रोजी सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. तेल कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. 1 मार्च 2024 रोजी दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 25.50 रुपयांनी वाढली आहे. याशिवाय महिन्याच्या पहिल्या दिवशी इतर नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया या 5 नियमांबद्दल..

एलपीजी सिलिंडर महागलादिल्लीत सिलिंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 26 रुपयांनी वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत 1795 रुपये, कोलकात्यात 1911 रुपये आणि मुंबईत 1749 रुपये झाली आहे. गेल्या महिन्यात 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पाच्या दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 14 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. कंपन्यांनी घरगुती 14 किलो गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केलेली नाही. 14.2 किलो LPG सिलेंडरची किंमत दिल्लीत 903 रुपये, कोलकात्यात 929 रुपये, मुंबईत 902.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 918.50 रुपये आहे.

शेअर बाजार 13 दिवस बंद राहणार

मार्च महिन्यात शेअर बाजार 13 दिवस बंद राहणार आहेत. मार्चमध्ये तीन दिवस सणांमुळे आणि वीकेंडच्या सुट्ट्यांमुळे 10 दिवस शेअर बाजार बंद राहणार आहे. मार्च महिन्यात 5 रविवार आणि 5 शनिवार असतात. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) मार्चमध्ये 13 दिवस व्यवहार करणार नाहीत. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शेअर बाजारात कोणताही व्यवहार होत नाही. मार्चमध्ये शिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडेमुळे शेअर बाजार बंद राहणार आहे.

मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील

मार्चमध्ये 14 दिवस बँका बंद राहतील. या 14 दिवसांच्या सुट्यांमध्ये सर्व रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार देखील समाविष्ट आहे. म्हणजेच साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त बँकांच्या सणासुदीमुळे आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. देशातील सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी 14 दिवस बँका बंद राहणार नाहीत. या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतील. ज्या राज्यांमध्ये सुट्ट्या आहेत त्या राज्यांमध्येच बँका बंद राहतील. मार्च महिन्यात शिवरात्री, होळी आणि गुड फ्रायडे असे सण असल्याने बँका बंद राहणार आहेत. बँकेशी संबंधित कोणतेही काम असल्यास सुट्ट्यांची यादी पहा.

फास्टॅग केवायसीभारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅगचे केवायसी अपडेट करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी होती, जी 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. तुम्ही 31 मार्च 2024 पर्यंत फास्टॅगसाठी केवायसी करून घेऊ शकता.

सोशल मीडियाचे नवीन नियमसरकारने अलीकडेच आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. X, Facebook, YouTube आणि Instagram सारख्या सोशल मीडिया ॲप्सना हे नियम पाळावे लागतील. मार्च महिन्यापासून सोशल मीडियावर चुकीच्या फॅक्टसह कोणतीही बातमी प्रसारित झाल्यास त्यासाठी दंड आकारला जाऊ शकतो. सोशल मीडिया सुरक्षित करणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. 

7 वा वेतन आयोगसरकारने महागाई भत्त्यात 4% ने वाढ केली, त्यासोबत तुम्हाला 8 महिन्यांची डीएची थकबाकी मिळेल.

टॅग्स :व्यवसायगुंतवणूकगॅस सिलेंडरफास्टॅगबँक