Join us

लॉकडाऊनमध्ये धावून आले मित्र-नातेवाईक; अडचणीच्या काळात उधारी-उसनवारीची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2020 07:03 IST

मित्र वा नातेवाईकांकडून पैसे उधार घेण्याचे प्रमाण २०१९ च्या तुलतेत २०२० मध्ये अधिक असल्याचे दिसते. 

खिशात पैसे नसतील तर खुशाल नातेवाईक, मित्र, शेजारच्यांकडून उधार-उसनवार घ्यायचे, ही भारतीयांची फार जुनी सवय. परंतु अलीकडच्या काळात यात बदल झाला. बँका, वित्तीय संस्था, पतपेढ्या, बडे व्यापारी, सावकार यांच्याकडून उसने पैसे घेतले जाऊ लागले. मात्र, कोरोनाकाळात लागलेल्या टाळेबंदीत आर्थिक अडचणीत सापडलेल्यांनी बँका वगैरेंकडे न जाता पुन्हा आपले नातेवाईक, मित्र, शेजारी-पाजारी यांच्याकडेच पैशांच्या मदतीसाठी धाव घेतल्याचे एका सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे... 

मित्र वा नातेवाईकांकडून पैसे उधार घेण्याचे प्रमाण २०१९ च्या तुलतेत २०२० मध्ये अधिक असल्याचे दिसते. २०१९ च्या तुलतेत २०२० मध्ये सावकार वा बँकांकडून खर्चासाठी कर्ज/उधारी घेण्याचे प्रमाण घटले आहे. शहरी भागातील कडक लॉकडाऊनमुळे दुकानदारांकडून उधार पैसे मिळण्याची शक्यता कमीच होती. पण ग्रामीण भागात हेच प्रमाण वाढल्याचे दिसते. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी आप्तांकडून सर्रास आर्थिक मदत घेतली जाते. लॉकडाऊनमुळे त्यातही घट झालेली दिसत असली तर आर्थिक मदतीसाठी आप्त धावून आल्याचेच दिसते.

टॅग्स :अर्थव्यवस्थाकोरोना वायरस बातम्या