Join us  

खरेदीत फसवणूक ? तत्काळ इथे तक्रार करा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:58 AM

उत्पादनाची किंमत; तसेच दर्जाबाबत काही अडचणी असल्या, ग्राहक न्यायालयात दाद मागता येते.

नवी दिल्ली : सणासुदीच्या उत्साहात सर्वांचाच खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. इतरांना केलेली खरेदी पाहून किंवा टीव्हीवरील जाहिराती पाहून लोक बाजारात धाव घेतात; परंतु नेमकी अशावेळी तुमची फसगत होण्याची भीती असते. जाहिरातींमध्ये केलेले दावे आणि प्रत्यक्षातील वस्तूंची स्थिती वेगळी असल्याचे आढळून येते; परंतु अशावेळी हताश होण्याची गरज नाही. या फसणुकीविरोधात दाद निवडण्याचे अनेक पर्याय ग्राहकांकडे असतात. उत्पादनाची किंमत; तसेच दर्जाबाबत काही अडचणी असल्या, ग्राहकन्यायालयात दाद मागता येते.

वकील देण्याची गरज नाहीदाखवलेली जाहिरात आणि प्रत्यक्ष वस्तूच्या पाकिटावरील महिती यात तफावत आढळल्यास तक्रार करता येते. ग्राहक न्यायालयात तुमच्या वतीने वकील देण्याची गरज नसते. कोर्टात तुम्हीच तुमची बाजू मांडू शकता, युक्तिवाद करू शकता.

टोल फ्री क्रमांक, ॲपवरही तक्रारीची सोयnफसवणुकीबाबत ग्राहक केंद्रामार्फत जारी केलेल्या १८००-११-४००० किंवा १९१५ या टोल फ्री कमांकावर फोन करून ग्राहकाला तक्रार देता येते.nनॅशनल कन्झ्युमर हेल्पलाइन अर्थात एनसीएच हे ॲप आपल्या मोबाइलवर डाऊनलोड करून त्यावरही तक्रार करता येते.nग्राहकाला फसवणुकीची तक्रार ८८००००१९१५ या क्रमांकावर एसएमएस पाठवून तक्रार नोंदवता येते.nhttps://consumerhelpline.gov.in/ या वेबसाइटवरही ऑनलाइन तक्रार नोंदविता येते.nऑफलाइन तक्रार करताना त्यासोबत सगळी कागदपत्रे जोडावी लागतात. तुमचे नुकसान कसे झाले, हे दाखवून देणारी कागदपत्रेही सोबत जोडावी लागतात.

टॅग्स :ग्राहकन्यायालय