Join us  

SBI आजपासून 'या' लोकांच्या खात्यात 2489 कोटी जमा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 1:39 PM

franklin templeton beneficiaries : एसबीआय एमएफने आधीही गुंतवणूकदारांच्या खात्यात 12,084 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. 12 एप्रिल 2021 मध्ये सुरू झालेल्या हप्त्यावेळी 2,962 कोटी रुपये वितरीत केले होते.

ठळक मुद्देजर युनिट धारकांचे बँक खाते डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे स्वीकारण्यास पात्र नसेल तर धनादेश किंवा 'डिमांड ड्राफ्ट' त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविला जाणार आहे. 

नवी दिल्ली: फ्रँकलिन टेंपलेटन (Franklin Templeton)  म्यूच्युअल फंडमधील (Franklin Templeton) बंद करण्यात आलेल्या सहा योजनांच्या गुंतवणुकदारांना 2489 कोटी रुपये देणार आहे. एसबीआय फंड्स मॅनेजमेंट (SBI MF) हे काम करणार आहे.(franklin templeton beneficiaries to receive rs 2489 cr in next tranche this week)

एसबीआय एमएफने आधीही गुंतवणूकदारांच्या खात्यात 12,084 कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. 12 एप्रिल 2021 मध्ये सुरू झालेल्या हप्त्यावेळी 2,962 कोटी रुपये वितरीत केले होते. फ्रँकलिन टेंपलेटन म्यूच्युअल फंडच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, एसबीआय म्यूच्युअल फंडच्या सहा योजनांच्या यूनिटधारकांना पुढील हप्त्यातील रक्कम 2488.75 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. ज्या गुंतवणूकदारांची केवायसी अपडेट असेल त्यांना 3 मे 2021 पासून पैसे देण्यात येतील.

युनिटच्या नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूच्या आधारे पैसे दिले जाणारयुनिटधारकांना 30 एप्रिल रोजी युनिटच्या नेट अ‍ॅसेट व्हॅल्यूच्या  (NAV) आधारे प्रमाणित पैसे दिले जातील. एसबीआय एमएफ पात्र गुंतवणूकदारांना डिजिटल पद्धतीने पैसे देण्यात येतील, असे प्रवक्त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टाने बंद करण्यात आलेल्या योजनांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाला लिक्विडेटर म्हणून नियुक्त केले आहे. जर युनिट धारकांचे बँक खाते डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पैसे स्वीकारण्यास पात्र नसेल तर धनादेश किंवा 'डिमांड ड्राफ्ट' त्याच्या नोंदणीकृत पत्त्यावर पाठविला जाणार आहे. 

फ्रँकलिन टेंपलेटनच्या 'या' योजना बंद होणारफ्रँकलिन टेंपलेटन (Franklin Templeton)  म्यूच्युअल फंडने ज्या सहा योजना केल्या आहेत, यामध्ये फ्रँकलिन इंडिया लो डुरेशन फंड (Franklin India Low Duration Fund) , फ्रँकलिन इंडिया डायनामिक एक्यूरल फंड (Franklin India Dynamic Accrual Fund), फ्रँकलिन इंडिया क्रेडिट रिस्क फंड (Franklin India Credit Risk Fund), फ्रँकलिन इंडिया शॉर्ट टर्म इनकम प्लान (Franklin India Short Term Income Plan),फ्रँकलिन इंडिया अल्ट्रा शॉर्ट बाँड फंड (Franklin India Ultra Short Bond Fund)आणि फ्रँकलिन इंडिया इनकम अपॉरच्यूनिटीज फंड (Franklin India Income Opportunities Fund)  या योजनांची नावे आहेत. यामध्ये तब्बल 25 हजार कोटी रुपये गुंतवणूक केली होती.

टॅग्स :एसबीआयपैसाबँक