Join us  

फॉक्सकॉन भारतात करणार १ अब्ज डॉलरची गुंतवणूक; चीनमधून काढता पाय घेण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 4:10 AM

कोरोना साथीच्या तडाख्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार व नेते चीनवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉनने हा निर्णय जाहीर करून भारत ही गुंतवणुकीसाठी अधिक योग्यबाजारपेठ असल्याचा संदेश दिला आहे.

नवी दिल्ली : अ‍ॅपलच्या आयफोनच्या असेंब्लिंगचे भारतात काम करणारी तैवानची कंपनी फॉक्सकॉनने भारतामध्ये १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. कोरोना साथीच्या तडाख्यामुळे जगभरातील गुंतवणूकदार व नेते चीनवर नाराज आहेत. त्या पार्श्वभूमीवर फॉक्सकॉनने हा निर्णय जाहीर करून भारत ही गुंतवणुकीसाठी अधिक योग्यबाजारपेठ असल्याचा संदेश दिला आहे.अ‍ॅपलच्या आयफोनच्या असेंब्लिंगचे चीनमध्येही मोठ्या प्रमाणावर काम चालते. मात्र कोरोना साथीस कारणीभूत ठरलेल्या चीनबाबत जागतिक उद्योगक्षेत्रातसध्या फारसे चांगले बोलले जात नाही. कोरोना साथीमुळे अमेरिकेचे प्रचंड नुकसान झाले असून तेथील कंपन्यांनी चीनमधून काढता पाय घेण्याचा विचार चालविला आहे.अ‍ॅपलही चीनमधून आपला असेंब्लिंग प्रकल्प दुसऱ्या देशात नेण्याच्यापवित्र्यात असल्याचे कळते. त्यामुळेच अ‍ॅपलसाठी काम करणाºया फॉक्सकॉन कंपनीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

टॅग्स :व्यवसायचीनभारत