Join us

ट्रम्प टॅरिफमुळे विकली गेली 'ही' फूटवेअर कंपनी, ९ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकमध्ये झाली डील; नाव काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 14:34 IST

जगभरात या ५,३०० रिटेल स्टोअर्स आहेत, त्यापैकी १,८०० कंपनीच्या मालकीची आहेत. अमेरिकेतील ९७ टक्के कपडे आणि फुटवेअर्स आशियातून आयात केली जातात.

इन्व्हेस्टमेंट फर्म थ्रीजी कॅपिटल स्केचर्स शू कंपनी ९ अब्ज डॉलरपेक्षा जास्त किंमतीत विकत घेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी वस्तूंवर, विशेषत: चीनमध्ये उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवर लादलेल्या शुल्काच्या व्यापारी परिणामाबाबत अनिश्चितता वाढत असताना हा करार करण्यात आला आहे. अॅथलेटिक शू उत्पादकांनी आशियातील उत्पादनावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. जगभरात स्केचर्सची ५,३०० रिटेल स्टोअर्स आहेत, त्यापैकी १,८०० कंपनीच्या मालकीची आहेत. अमेरिकेतील ९७ टक्के कपडे आणि फुटवेअर्स आशियातून आयात केली जातात.

स्केचर्सच्या शेअरमध्ये २५ टक्के वाढ

ईटीच्या रिपोर्टनुसार, स्केचर्सच्या १५ दिवसांच्या वॉल्यूम-वेटेड सरासरी शेअरची किंमत ३०% जास्त आहे. कंपनीच्या संचालक मंडळानं ६३ डॉलर प्रति शेअर या दरानं हा करार एकमतानं मंजूर केला. सोमवारी स्केचर्सचा शेअर २५ टक्क्यांनी वधारून ६१.५६ डॉलरवर पोहोचला.

भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?

टॅरिफचा परिणाम

फॅक्टसेटच्या आकडेवारीनुसार, स्केचर्सच्या महसुलापैकी सुमारे १५% उत्पन्न चीनमधून येते. ट्रम्प यांनी एप्रिलमध्ये चीनमधून होणाऱ्या आयातीवरील शुल्क वाढवून १२५ टक्के केलं, तर चीननं अमेरिकेच्या वस्तूंवर ८४ टक्के शुल्क लादलं. "चीनमधून अमेरिकेत येणाऱ्या उत्पादनांवरील १५९% प्रभावी शुल्क अत्यंत महाग आहे," अशी प्रतिक्रिया स्केचर्सचे सीएफओ जॉन वँडरमोर यांनी दिली.

हा करार कधी पूर्ण होणार?

२०२४ मध्ये स्केचर्सने ९ अब्ज डॉलर्सचा विक्रमी महसूल आणि ६४ कोटी डॉलर्सचा निव्वळ नफा नोंदवल्यानंतर हा करार करण्यात आला आहे. थ्रीजी कॅपिटलसोबतचा करार या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. कंपनीचं मुख्यालय कॅलिफोर्नियातील मॅनहॅटन बीच येथे असेल.

टॅग्स :टॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पव्यवसाय