Join us
Daily Top 2Weekly Top 5

खाण्यापिण्याची चंगळ, कपडेही स्वस्त; महागाईचा दर घसरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 06:17 IST

सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक महागाईच्या दरात घट नाेंदविण्यात आली आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे जून महिन्यात घाऊक महागाईचा दर घटून-४.१२ टक्क्यांवर आला आहे. गेल्या आठ वर्षांतील हा नीचांकी दर आहे. सलग तिसऱ्या महिन्यात घाऊक महागाईच्या दरात घट नाेंदविण्यात आली आहे.

जून महिन्यात प्रामुख्याने मिनरल ऑइल्स, खाण्यापिण्याच्या वस्तू, धातू, कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि वस्त्रांच्या किमती कमी झाल्यामुळे घाऊक महागाईचा दर घटला. याशिवाय इंधन आणि विजेच्या दरात १२.६३ टक्के घट नाेंदविण्यात आली. उत्पादन क्षेत्रातील महागाई घटून २.७१ टक्क्यांवर आली आहे.

n-३.८१ टक्के घाऊक महागाईचा दर २०१५मध्ये नाेंदविण्यात आला हाेता.n-३.४८ टक्के दर मे महिन्यात हाेता. 

n१५.८१ टक्के दर जून २०२२मध्ये हाेता.n३२.६८% वार्षिक घट क्रूड पेट्राेलियम महागाई दरात.

nघाऊक महागाईचा दर दीर्घकाळ जास्त असल्यास उत्पादन क्षेत्रांवर प्रतिकूल परिणाम हाेताे. उत्पादक याचा बाेजा थेट ग्राहकांवर टाकतात.

 

टॅग्स :महागाईहॉटेल