FMCG Price Hike 2026 : गेल्या वर्षी केंद्र सरकारने जीएसटी दरात कपात केल्यामुळे सर्वसामान्यांना मिळालेला दिलासा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती आणि रुपयाची घसरण यामुळे त्रस्त झालेल्या 'फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स' कंपन्यांनी आता दरवाढीचे पाऊल उचलले आहे. डिटर्जेंटपासून ते हेअर ऑईलपर्यंतच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत ५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
जीएसटी कपातीचा प्रभाव ओसरलासप्टेंबर २०२५ मध्ये सरकारने अनेक जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटीचे दर घटवले होते, ज्याचा फायदा ग्राहकांना मिळाला होता. कंपन्यांनी 'अँटी-प्रॉफिटियरिंग' नियमांमुळे काही काळ किमती स्थिर ठेवल्या होत्या. मात्र, आता उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांना किमती वाढवणे अपरिहार्य झाले आहे.
'होम' आणि 'पर्सनल केअर' वस्तूंच्या किमतीत वाढदैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे नवीन आणि वाढीव दरांचे साठे बाजारात येऊ लागले आहेत.
- हिंदुस्तान युनिलिव्हर : 'सर्फ एक्सेल' आणि 'रिन' यांसारखे ब्रँड्स बनवणाऱ्या या कंपनीने होम केअर उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीचे सीएफओ निरंजन गुप्ता यांनी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.
- डाबर इंडिया : डाबरने चौथ्या तिमाहीत आपल्या उत्पादनांच्या किमती २ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. ज्यूस, हेअर ऑईल आणि इतर वैयक्तिक निगा राखणाऱ्या वस्तूंसाठी आता ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागतील.
वाचा - SIP मधून श्रीमंत व्हायचंय? मग 'इतकी' वर्षे तरी थांबाच! गुंतवणुकीचा पैसा नेमका कधी वेगाने वाढतो?
दरवाढीची मुख्य कारणेसाबण आणि डिटर्जेंट बनवण्यासाठी लागणाऱ्या पेट्रोलियम आधारित कच्च्या मालाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.जागतिक बाजारात रुपया कमकुवत झाल्यामुळे आयात खर्च वाढला असून त्याचा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होत आहे.डिस्ट्रीब्युटर्सच्या मते, नूडल्स, चॉकलेट आणि हेअर ऑईल यांसारख्या वस्तूंचे नवीन साठे आता वाढीव किमतींसह दुकानांमध्ये पोहोचू लागले आहेत.
Web Summary : FMCG companies like Dabur and Unilever are increasing prices up to 5% due to rising raw material costs and a weaker rupee. Price hikes affect detergents, hair oil, and other daily essentials. GST rate cuts' benefits are fading, impacting household budgets.
Web Summary : डाबर और यूनिलीवर जैसी एफएमसीजी कंपनियां कच्चे माल की बढ़ती लागत और कमजोर रुपये के कारण कीमतों में 5% तक की वृद्धि कर रही हैं। मूल्य वृद्धि डिटर्जेंट, हेयर ऑयल और अन्य दैनिक आवश्यक वस्तुओं को प्रभावित करती है। जीएसटी दर में कटौती के लाभ कम हो रहे हैं, जिससे घरेलू बजट प्रभावित हो रहा है।