Join us  

भारत-चीनमधील तणावाचा सोने-चांदीवर परिणाम अन् दरांमध्ये मोठे चढ-उतार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 2:27 AM

२०० रुपयांनी वाढ होऊन सोने ४८ हजार ९००, तर चांदी ४९ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेत अस्थिरता निर्माण झाल्याने हा चढ-उतार झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून स्थिर असलेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवारी दिवसभरात चढ-उतार पाहायला मिळाला. सकाळी सोने व चांदीत ३०० रुपयांनी घसरण झाली. मात्र नंतर दुपारी पुन्हा त्यात २०० रुपयांनी वाढ होऊन सोने ४८ हजार ९००, तर चांदी ४९ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. अमेरिकेत अस्थिरता निर्माण झाल्याने हा चढ-उतार झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.भारत-चीनमधील तणावाचा परिणाम सुवर्ण बाजारावर जाणवत असून, त्यामुळे भाव वाढतच आहे. शुक्रवार, २६ जून रोजी जळगावात सोने व चांदी दोघेही ३०० रुपयांनी घसरले. त्यानंतर सोने पुन्हा २०० रुपयांनी वधारले व ते ४८ हजार ९०० रुपयांवर पोहोचले. चांदीही २०० रुपयांनी वधारून ती ४९ हजार ९०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. शुक्रवारी भाव कमी झाले तरी जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढत असल्याने सोन्याचे भाव वाढतच राहणार असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.

टॅग्स :सोनं