लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शेअर बाजारात जागतिक स्तरावर अस्थिरता असताना भारतीय आयपीओ मार्केटने मोठी भरारी घेतली आहे. मार्च २०२६ या एकाच महिन्यात ३८ कंपन्यांनी आयपीओसाठी ‘सेबी’कडे प्राथमिक प्रस्ताव (डीआरएचपी) दाखल केले. दोन वर्षांच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे. मार्च २०२४ मध्ये १६ आणि २०२५ मध्ये २२ कंपन्यांनी आयपीओसाठी अर्ज केले होते, त्या तुलनेत यंदाचा ३८ हा आकडा कंपन्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास दर्शवतो.
कोणते आयपीओ येणार?
आयपीओसाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये एसबीआय फंड्स मॅनेजमेंट आणि मणिपाल हेल्थ एंटरप्रायझेस यांसारख्या बड्या नावांचा समावेश आहे. रिलायन्स जिओ, एनएसईसारखे आयपीओदेखील बाजारात धडकण्याची शक्यता आहे. आर्थिक वर्षाच्या शेवटी अर्ज केल्यामुळे कंपन्यांना पुढील १२ महिने बाजारात उतरण्यासाठी उपलब्ध होतात.
आयपीओ बाजार...
१२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत’
सध्या ६४ कंपन्या ‘सेबी’च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत, तर १२४ कंपन्यांना मंजुरी मिळूनही त्या योग्य वेळेची वाट पाहत आहेत.
गुंतवणूकदारांची चांदी
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये १०९ आयपीओ आले, ज्यापैकी ६९ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.
गोपनीयतेचा मार्ग का?
‘झेटवर्क’ आणि ‘गरुडा एरोस्पेस’सह ९ कंपन्यांनी ‘कॉन्फिडेंशियल फाईलिंग’चा पर्याय निवडला आहे.
Web Summary : Indian IPO market surges with 38 companies filing draft papers in March 2026. Big names like SBI Funds and Manipal Health are included. 124 companies await launch, and most IPOs in FY25-26 yielded good returns for investors, signaling strong market confidence.
Web Summary : भारतीय आईपीओ बाजार में उछाल, मार्च 2026 में 38 कंपनियों ने ड्राफ्ट पेपर दाखिल किए। एसबीआई फंड्स और मणिपाल हेल्थ जैसे बड़े नाम शामिल हैं। 124 कंपनियां लॉन्च का इंतजार कर रही हैं, और एफवाई25-26 में अधिकांश आईपीओ ने निवेशकों को अच्छा रिटर्न दिया, जो बाजार में मजबूत विश्वास का संकेत है।