Join us  

Flipkart : दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये कर्मचारी कपात; जाणून घ्या किती लोकांना घरी पाठवले जाणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2024 6:39 PM

गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे.

नवी दिल्ली : ऑनलाइन ई-कॉमर्स (E-Commerce) क्षेत्रातील दिग्गज कंपनी फ्लिपकार्टमध्ये (Flipkart) पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Layoff) करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी सातत्याने कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आहे. यावर्षी देखील कामगिरीच्या आधारे (परफॉर्मेंस) वॉलमार्टच्या (Walmart) मालकीची कंपनी फ्लिपकार्टने आपल्या किमान 5 ते 7 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंपनीच्या या निर्णयामुळे अंदाजे 1500 कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे. ऑनलाइन ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टद्वारे करण्यात येत असलेली ही कारवाई मार्च ते एप्रिल दरम्यान पूर्ण होईल. गेल्या दोन वर्षांपासून कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना परफॉर्मेंसच्या आधारे सातत्याने कामावरून काढत आहे. कंपनीने वार्षिक परफॉर्मेंस आढाव्याच्या आधारे कपतीची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षभरापासून फ्लिपकार्टने नवीन नोकऱ्या निर्माण केल्या नाहीत. सध्या कंपनीत सुमारे 22 हजार कर्मचारी काम करतात. कंपनीने 7 टक्के कामावरून काढून टाकल्यास सुमारे 1500 कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची खात्री आहे. ऑनलाइन ईकॉमर्स प्लॅटफॉर्म गेल्या काही काळापासून खर्चावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहेत. 

फ्लिपकार्ट 2024 मध्ये IPO आणण्याचा तयारीतफ्लिपकार्ट 2024 मध्ये IPO लाँच करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. कंपनी गेल्या आर्थिक वर्षापासून IPO आणण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडेच कंपनीने अदानी समूहाकडून क्लिअरट्रिप खरेदी केली आहे. वॉलमार्टकडून फ्लिपकार्टला मिळणारा $1 बिलियन फायनान्स पूर्ण होणार आहे. याचा परिणाम त्यांच्या धोरणात्मक निर्णयांवर होईल. अलीकडच्या काळात, PayTm, Meesho आणि Amazon सारख्या अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपतीचा मार्ग स्वीकारला आहे.

टॅग्स :फ्लिपकार्टकर्मचारी