Join us

फ्लिपकार्टचे संस्थापक बन्सल यांनी भरला ६९९ कोटींचा कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2019 01:21 IST

फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ६९९ कोटींचा कर भरला आहे. कंपनीचे समभाग विकून मिळालेल्या भांडवली उत्पन्नावरील कराचाही यात समावेश आहे.

नवी दिल्ली : फ्लिपकार्टचे संस्थापक सचिन बन्सल यांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ६९९ कोटींचा कर भरला आहे. कंपनीचे समभाग विकून मिळालेल्या भांडवली उत्पन्नावरील कराचाही यात समावेश आहे. सचिनचे भागीदार बिन्नी बन्सल यांनी आपल्या भांडवली उत्पन्नाची माहिती प्राप्तिकर विभागाला अद्याप दिलेली नाही.सुमारे दोन महिन्यांपूर्वी दोघांनीही फ्लिपकार्टमधील समभाग विकले होते. नंतर प्राप्तिकर विभागाने त्यांना नोटिसा बजावत यातून मिळालेल्या उत्पन्नाची माहिती मागितली. त्यानंतर सचिन यांनी ६९९ कोटींचा कर भरला. फ्लिपकार्टचे समभाग विकत घेणाऱ्या वॉलमार्टलाही अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची नोटीस प्राप्तिकर विभागाने बजावली होती. वॉलमार्टने ४६ समभागधारकांकडून फ्लिपकार्टचे ७७ टक्के समभाग १६ अब्ज डॉलर्सना विकत घेतले. नोटिशीनंतर वॉलमार्टने ७,४४० कोटींचा कर भरल्याचे समजते.

टॅग्स :फ्लिपकार्ट