Join us

Flipkart चे सह-संस्थापक सचिन बन्सल यांची १४.२६ कोटींची फसवणूक; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:16 IST

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्स यांच्या फिनटेक या स्टार्टअप कंपनीला घोटाळेबाजांनी १४ कोटींचा चुना लावला आहे.

फ्लिपकार्टचे सह-संस्थापक सचिन बन्सल यांच्या नवीन कंपनीची घोटाळेबाजांनी १४. २६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बातमी समोर आली आहे. बंगळुरूस्थित नवीन फिनटेक स्टार्टअप, नवी टेक्नॉलॉजीला गेल्या महिन्यात १४.२६ कोटी रुपयांचा फसवणूकीचा सामना करावा लागला. ग्राहक असल्याचे भासवून, स्कॅमर्सनी सिस्टममधील बगचा फायदा घेतला आणि स्टार्टअपकडून मोठी रक्कम लुटली.

तुर्कीमधील कार्तलकाया रिसॉर्टला भीषण आग; पर्यटकांनी उड्या मारल्या, ६६ जणांचा मृत्यू

बंगळुरूमधील व्हाईटफील्ड सायबर क्राइम पोलिसांनी शनिवारी या घोटाळ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू करण्यात आला आहे.

एका बगमुळे झाली फसवणूक 

फिनटेक कंपनीचे अधिकारी श्रीनिवास गौडा म्हणाले की, डिसेंबरमध्ये १४ दिवसांसाठी नवी ग्राहकांना अॅपद्वारे पैसे भरण्याचा पर्याय होता. ते थर्ड पार्टी पेमेंट गेटवे, TPAP वापरून फिनटेक अॅपवरून मोबाइल रिचार्ज, EMI आणि इतर सेवांसाठी पैसे देऊ शकत होते. पेमेंट प्रक्रियेत एक बग होता, यामुळे काही स्कॅमरना कंपनीची फसवणूक करता आली.

ज्यावेळी ग्राहकाने नवी अॅपवर पेमेंट सुरू केले तेव्हा TPAP गेटवेवर पेमेंट रक्कम संपादित करण्याचा पर्याय होता. पेमेंट प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हा पर्याय उपलब्ध होता. या पळवाटाचा फायदा घोटाळेबाजांनी घेतला. त्याने नवी अ‍ॅपवर त्याच्या सोयीनुसार ५०० किंवा १००० रुपये टाकले आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण केली. पण यानंतर, ते TPAP गेटवेवर गेला आणि त्याने पेमेंटची रक्कम १ रुपये केली.

यामुळे सिस्टीमने संपादित रकमेसाठी व्यवहार यशस्वी झाल्याचे मानले. तर नवी टेक्नॉलॉजीजना ग्राहकाने आधी निवडलेली पूर्ण रक्कम (रु. ५०० किंवा रु. १०००) भरावी लागली. या बग स्कॅमर्समुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले. अशा पद्धतीने घोटाळेबाजांनी नवी टेक्नॉलॉजीजची १४ कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक केली.

फ्लिपकार्ट सोडल्यानंतर काही महिन्यांनीच सचिन बन्सल यांनी २०१८ मध्ये नवी कंपनी सुरू केली. गेल्या वर्षी त्यांनी केलेली वक्तव्य व्हायरल झाले होते. आठवड्यातून ८० ते १०० तास काम करतो, पण इतरांकडूनही अशीच अपेक्षा करत नाही, असं त्यांनी म्हटले होते.

टॅग्स :फ्लिपकार्टधोकेबाजी