Join us

मुदत ठेव याेजनांवर आता अधिक व्याज मिळणार; बँका गुंतवणूकदारांना आकर्षिक करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 07:31 IST

मुदत ठेव याेजनांवर जास्त व्याजदर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे. 

नवी दिल्ली - आरबीआयने गेल्या दाेन वर्षांपासून रेपाे रेट स्थिर ठेवला आहे. त्यामुळे गृहकर्जांवरील व्याजदरही स्थिर आहे. गृहकर्जदारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. आता काही बँकांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव याेजनांवरील व्याजदर वाढविले आहेत.

साधारणत: ०.१० ते ०.४० टक्के व्याजदर वाढविले आहेत. नवे दर १ जुलैपासूनच लागू करण्यात आले. बँकांमध्ये सध्या जमा याेजनांच्या तुलनेत कर्जांची मागणी जास्त आहे. त्यामुळे अनेक बँकांना राेखीची चणचण भासत आहे. त्यासाठीच मुदत ठेव याेजनांवर जास्त व्याजदर देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा बँकांचा प्रयत्न आहे. 

कसे आहेत बँकांचे दर

आयसीआयसीआय बँक - ६.७ ते ७.७५%

ॲक्सिस बँक - ७.१० ते ७.७५%

उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक - ८.२५ ते ८.७५%

बँक ऑफ इंडिया - ७.३ ते ७.८०%

पंजाब अँड सिंध बँक - ६.३ ते ७.८० 

इंडसइंड बँक  - ३ ते ८.२५

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक