Join us  

Fixed Deposit: एफडी करण्याआधी या गोष्टी जाणून घ्या; नाहीतर नंतर नुकसान होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 8:56 PM

Fixed Deposit smart invest: एफडी ही सुरक्षेसोबत सेव्हिंग करण्याचा चांगला पर्याय आहे. मात्र, असे असले तरी याच्या काही गोष्टी अशा आहेत ज्यावर वेळीच लक्ष दिले नाही तर नंतर नुकसान होऊ शकते. काही गोष्टी माहिती करून घ्या. 

फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit in Marathi) म्हणजेच एफडी ही सुरक्षेसोबत सेव्हिंग करण्याचा चांगला पर्याय आहे. मात्र, असे असले तरी याच्या काही गोष्टी अशा आहेत ज्यावर वेळीच लक्ष दिले नाही तर नंतर नुकसान होऊ शकते. काही गोष्टी माहिती करून घ्या. 

एफडी करण्याआधी तिचा कालावधी, मुदत आदी बाबत विचार करावा. एफडी मॅच्युअर होण्याआधी जर ती तोडली तर दंडही भरावा लागतो. एफडी केली म्हणजे आयकरातून सूट मिळते असे नाही. आयकर सूट मिळविण्यासाठी ती एफडी कमीतकमी 5 वर्षे मुदतीची असायला हवी. यामध्ये तुम्ही व्याजावर कर माफी घेऊ शकता. मात्र, जर हे व्याज वर्षाला 10000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर 10 टक्के टीडीएस कापला जातो. 

फायद्याची गोष्टकधीही मोठी रक्कम एकाच एफडीमध्ये गुंतवू नका. जर तुम्हाला 20 लाखांची एफडी कराय़ची असेल तर एक एक लाखाच्या 10, 2-2 लाखांच्या चार आणि 50-50 हजारांच्या चार अशा एफडी कराव्यात. व्याज तेवढेच भेटते. परंतू जर तुम्हाला पैशांची गरज असेल आणि दीड दोन लाख हवे असतील तर अख्खी 20 लाखांची एफडी मोडली तर त्यावर दंड बसतो. हा दंड वाचेल आणि उर्वरित रक्कमेची एफडी सुरु राहिल. 

ज्येष्ठ नागरिकांना सर्वच बँका जास्त व्याज देतात. अशा स्थितीत जर तुमच्या घरात जर कोणी असेल तर त्याच्या नावावर एफडी केली तर जास्त फायदा होईल. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे बँकांमध्ये आधी तीन महिने किंवा वर्षाच्या आधारावर व्याज काढण्याचा पर्याय होता. काही बँकांमध्ये हे महिन्याच्या महिन्य़ाला व्याज काढता येते. ही बाब तुमच्या गरजेनुसार ठरवावी. म्हणजे तुम्हाला 3 महिन्यांची वाट पहावी लागणार नाही. जास्त व्याजदर कोणत्या बँकेत आहे ते देखील पहावे.

टॅग्स :बँकपैसा