नवी दिल्ली : सेवा क्षेत्रात २०१८-१९ या वित्तीय वर्षात ९.१५ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली असून मागील वित्तीय वर्षाच्या तुलनेत ३६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१७-१८ मध्ये सेवा क्षेत्रात ६.७ अब्ज डॉलरची थेट विदेशी गुंतवणूक झाली होती. सेवा क्षेत्रात वित्त, बँक, विमा, आऊसोर्सिंग, संशोधन-विकस आणि कुरियर, तंत्रज्ञान चाचणी आणि विश्लेषणाचा समावेश आहे. सेवा क्षेत्राच्या विस्तारासाठी यातून चांगले संकेत मिळत आहेत.
केंद्र सरकारने गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सेवा क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीत वाढ होणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कारण ढोबळ राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) सेवा क्षेत्राचे योगदान ६० टक्क्यांहून अधिक आहे. एप्रिल २००० मार्च २०१९ दरम्यान भारतात आलेल्या थेट विदेशी गुंतवणुकीपैकी या क्षेत्राचा वाटा १८ टक्के हिस्सा आहे. २०१८-१९ च्या मागील सहा महिन्यात पहिल्यांदाच एकूण थेट विदेशी गुंतवणुकीत घट होत ४४.३७ अब्ज डॉलर एवढीच गुंतवणूक आली होती.