Join us  

बाळाचे बाप होताय?, 'या' कंपनीत १२ आठवड्यांची रजा; १ जानेवारीपासून नवं धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 4:01 PM

फायझर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे कौतूक होत आहे, कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यास १२ आठवडे म्हणजे जवळपास ३ महिने ही सुट्टी मिळणार आहे.

महिलांना गरोदरपणात प्रसुती रजा देण्यात येते. रज्यात महिला शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक 2017 च्या शासन निर्णयान्वये 180 दिवसापर्यंत “विशेष रजा”अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सरोगसी पध्दतीने जन्मलेल्या अपत्याचे संगोपन करण्यासाठीही विशेष रजेची तरतूद शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे. तर, कंपनी अॅक्टनुसार खासगी कंपन्यांनाही हा नियम लागू आहे. आता, बाळ जन्माला येत असल्याने मुलाच्या वडिलांनाही रजा देण्यात येणार आहे. फायझर कंपनीने १ जानेवारी २०२३ पासून नवीन धोरण अवलंबले आहे. त्यानुसार, नवपित्यास १२ आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे. 

फायझर कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचे मोठे कौतूक होत आहे, कंपनीच्या नव्या धोरणानुसार कर्मचाऱ्यास १२ आठवडे म्हणजे जवळपास ३ महिने ही सुट्टी मिळणार आहे. मात्र, ही पॅटर्निटी लिव्ह सलग तीन महिने घेण्यात येणार नसून  ४ टप्प्यांमध्ये मिळणार आहे. नवजात बाळ किंवा बाळ दत्तक घेतलेल्या वडिलांना दोन वर्षांच्या कालावधीत 12 आठवड्यांची रजा घेता येणार आहे. कंपनीकडून कर्मचाऱ्यांनी चार टप्प्यात ही रजा घेण्याची तरतूद आहे. 

'आम्हाला विश्वास आहे की प्रगतीशील कार्य आणि भविष्यातील दृष्टीकोन पाहता कंपनीने हे नवीन धोरण लागू केले आहे. 12 आठवड्यांची पितृत्व रजा पॉलिसीमुळे (Paternity Leave Policy) पुरुष सहकाऱ्यांना आणि त्यांच्या जोडीदारांना पालकत्वाचा अनुभव आणि आनंददायी क्षण जपण्यास पुरेसा वेळ मिळेल,' असे  फायझर इंडियाचे  डायरेक्टर पीपल एक्सपिरिअन्स शिल्पी सिंह यांनी म्हटले आहे. 

वडील झाल्यावर कर्मचाऱ्याला कंपनीकडून कमीत कमी दोन आठवडे आणि जास्तीत जास्त सहा आठवड्यांपर्यंत सुट्टी घेण्याचा पर्याय उपलब्ध असेल. यामध्ये पॅटर्निटी लिव्ह (Paternity Leave), प्रासंगिक रजा (Casual Leave), ऐच्छिक रजा (Elective Holidays) या रजा मिळून सुट्ट्या घेण्याचा पर्याय असेल. दरम्यान, बाळाचे संगोपन ही आईची जबाबदारी असल्‍याच्या रूढी आता मोडत आहे. बाळाच्या जन्मानंतर आई आणि वडील दोघांचाही बाळाच्या संगोपनात मोठा वाटा असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळेच कंपन्याककडून ही बाब लक्षात पॅटर्निटी लिव्हमध्ये वाढ करण्यात येत आहे. 

टॅग्स :जागतिक पितृदिनकामगारबेबीज डे आऊट