Join us  

गूड न्यूज! शेतकऱ्यांना ५ मिनिटांत मिळणार कर्ज, नाबार्डनं RBI सोबत केला करार; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 2:55 PM

Kisan Credit Card: शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता ३ ते ४ आठवड्यांची वाट पाहावी लागणार नाही.

KCC Loan: शेतकऱ्यांना कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. शेतकऱ्यांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी आता ३ ते ४ आठवड्यांची वाट पाहावी लागणार नाही. आता त्यांना केवळ ५ मिनिटांमध्ये कर्ज मिळणार आहे. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेनं (NABARD) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) शाखा आरबीआयएच (RBIH) सोबत करार केली आहे. 

नाबार्डने आपल्या ई-केसीसी लोन (e-KCC loan) प्लॅटफॉर्मला रिझर्व्ह बँकेच्या पूर्ण मालकीच्या रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबच्या (RBIH) पब्लिक टेक प्लॅटफॉर्म फॉर फ्रिक्शनलेस क्रेडिट (PTPFC) जोडलं जाईल. नाबार्डनं सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसाठी (आरआरबी) डिजिटल किसान क्रेडिट कार्ड (KCC) कर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी क्रेडिट सिस्टम प्लॅटफॉर्म तयार केला आहे. 

अॅग्री लोन्सच्या डिजिटायझेशनमुळे बँकांची कार्यक्षमता सुधारेल आणि शेतकऱ्यांना त्वरित कर्ज पुरवठा करणं शक्य होईल. यामुळे नाबार्डचं ग्रामीण समृद्धीला चालना देण्याचे मिशन पुढे जाईल, अशी प्रतिक्रिया नाबार्डचे चेअरमन शाजी के.व्ही. यांनी दिली.  

५ मिनिटांत मिळणार अॅग्री लोन 

नाबार्डचे अध्यक्ष आणि रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बन्सल यांनी भागीदारी करारावर स्वाक्षरी केली. त्यांच्या वक्तव्यानुसार, भागीदारीमुळे कर्जाची प्रक्रिया सुरळीत होईल आणि देशातील १२ कोटी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटपाचा कालावधी तीन-चार आठवड्यांवरून केवळ पाच मिनिटांवर येईल.

टॅग्स :शेतकरीबँकसरकारभारतीय रिझर्व्ह बँक