Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऑफिसमधील 'साहेबां'पेक्षा कारखान्यातील 'घाम' महागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 12:15 IST

सर्वात जास्त वेतनाचा विचार केल्यास आयटी क्षेत्र आजही अव्वल स्थानी आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बदलत्या अर्थव्यवस्थेत आता पांढरपेशा नोकऱ्यांपेक्षा शारीरिक श्रम आणि तांत्रिक कौशल्य असणाऱ्या कामगारांच्या श्रमाला अधिक किंमत मिळू लागली आहे. कार्यालयातील (ऑफीस) सुरुवातीच्या स्तरावरील नोकऱ्यांच्या तुलनेत कारखाने आणि डिलिव्हरी आणि इतर शारीरिक श्रमाशी निगडीत कामगारांच्या पगारात वेगाने वाढ होत असल्याचे एका ताज्या अहवालातून समोर आले आहे.

डिजिटल जॉब प्लॅटफॉर्म 'वर्कइंडिया'ने प्रसिद्ध केलेल्या वेतन अहवालानुसार, २०२४च्या तुलनेत २०२५मध्ये कामगारांच्या किमान वेतनात ८.६० टक्क्यांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, ऑफीसमधील एन्ट्री लेव्हलच्या नोकऱ्यांमधील वेतनवाढीचा दर यापेक्षा कमी आहे. शारीरिक श्रमाशी संबंधितकामगारांचे वेतन २०२४मध्ये किमान १४,०५६ रुपये होते, ते २०२५मध्ये वाढून १५,२६५ रुपये झाले. 

याउलट, कार्यालयीन क्षेत्रातील प्रवेश स्तरावरील नोकऱ्यांमध्ये वेतनवाढ तुलनेने मंद राहिली आहे. या गटात वेतन १४,७६० रुपयांवरून १५,७५६ रुपये इतकेच वाढले. डिलिव्हरी, चालक आणि वाहनसंबंधित क्षेत्रांमध्ये वेतनवाढ सर्वाधिक नोंदली गेली असून, ती १६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सर्वात जास्त वेतनाचा विचार केल्यास आयटी क्षेत्र आजही अव्वल स्थानी आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Blue-collar jobs outpace white-collar in wage growth: Report

Web Summary : Physical labor and technical skills are now more valued than office jobs. A report reveals faster wage growth for factory and delivery workers compared to entry-level office roles, with delivery seeing 16% increases. IT sector salaries remain highest overall.
टॅग्स :पगार