Join us  

Facebook Loan: नो टेन्शन! Business साठी कर्ज मिळत नाहीय; Facebook झटक्यात देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 4:55 PM

Facebook Giving Loan to Business: अजित मोहन यांनी सांगितले की, फेसबुक याद्वारे या व्यापारी वर्गाला मदत करेल. यात फेसबुकचा काहीही फायदा नाहीय. Indifi सोबत करार केला आहे, परंतू व्यवसाय करण्याचा काहीही उद्देश नाहीय. 

फेसबुकने छोटे आणि मध्यम उद्योजकांना  (MSME) Small Business Loans initiative सुरु केले आहे. यामुळे या उद्योगांना 5 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हे कर्ज देशभरातील 200 शहरामध्ये उपलब्ध केले जाणार आहे. यासाठी फेसबुकने Indifi सोबत करार केला आहे. ही कंपनी MSME ला कर्जवाटप करते. (Facebook Launches 'Small Business Loans Initiative' In India.)

फेसबुक इंडियाचे व्हीपी आणि एमडी अजित मोहन यांनी हे कर्ज लाँच केले आहे. या कर्जासाठी कोणताही collateral लागणार नाही. कर्ज 5 दिवसांत मंजूर केले जाईल. याचा व्याजदर 17 ते 20 टक्के एवढा असेल. महिला व्यावसायिकांना व्याजदारत 0.2 टक्के सूट दिली जाणार आहे. लोन मिळविण्यास त्रास होत असलेल्या व्यावसायिकांना कमीत कमी वेळात लोन मिळावे म्हणून ही सोय फेसबुकने केल्याचे त्यांनी सांगितले. 

मोहन म्हणाले की, या मोहिमेचे लक्ष्य Business Loan सहज, सोपे बनविणे हा आहे. भारत पहिला देश आहे, जिथे फेसबुकने ही योजना आणली आहे. Ficci चे अध्यक्ष उदय शंकर यांनी सांगितले की, फेसबुकची ही मोहिम प्रशंसेस पात्र आहे. MSME सेक्‍टर ला पुढे नेण्यासाठी यामुळे मदत मिळेल. ज्या कंपन्या काही तारण ठेवू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हे कर्ज उपयोगाचे आहे. या कंपन्यांना खेळते भांडवल मिळाले तर त्या विकास करू शकतील. कर्जाला गॅरंटी काही मिळत नसल्याने बँका आणि अन्य कंपन्या त्यांना कर्ज देत नाहीत. ही समस्या दूर होईल.

नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी सांगितले की, MSME हा देशाच्या विकासाचा कणा आहे. Facebook ची ही मोहिम या विकासाला मदत करण्यासाठी एक मोठे पाऊल आहे. 

फेसबुकला फायदा काय?अजित मोहन यांनी सांगितले की, फेसबुक याद्वारे या व्यापारी वर्गाला मदत करेल. यात फेसबुकचा काहीही फायदा नाहीय. Indifi सोबत करार केला आहे, परंतू व्यवसाय करण्याचा काहीही उद्देश नाहीय. 

टॅग्स :फेसबुकव्यवसाय