Join us
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी नोटांवर मंदिरांना स्थान! मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला; भारतीय पर्यटकांचा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 11:35 IST

Bangladeshi Taka vs Indian Rupee : बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचे सरकार पायउतार झाल्यानंतर तिथे पहिल्यांदाच सार्वजनिक निवडणुका पार पडत आहेत.

Bangladeshi Taka vs Indian Rupee : शेजारील देश बांगलादेश आज एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे. प्रदीर्घ अस्थिरतेनंतर आणि शेख हसीना सरकार पायउतार झाल्यानंतर सुमारे दीड वर्षांनी, आज बांगलादेशात नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान होत आहे. या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेत आणि चलनातही मोठे बदल पाहायला मिळत आहेत. विशेषतः भारतीय रुपयाच्या तुलनेत बांगलादेशी 'टका' घसरल्याने सीमेपलीकडील व्यापारावर त्याचे पडसाद उमटत आहेत.

भारतीय ५०० रुपयांचे बांगलादेशात मूल्य किती?आजच्या म्हणजेच १३ फेब्रुवारी २०२६ च्या विनिमय दरानुसार, भारतीय रुपया बांगलादेशी चलनाच्या तुलनेत वरचढ ठरला आहे. १ भारतीय रुपया बांगलादेशच्या १.३५ बांगलादेशी टकाबरोबर आहे. जर तुम्ही बांगलादेशात ५०० भारतीय रुपये घेऊन गेलात, तर तिथे तुम्हाला सुमारे ६७६.६५ टका मिळतील. १ लाख भारतीय रुपयांचे मूल्य बांगलादेशात १,३५,३३० टका इतके होते.

हिंदू-बौद्ध मंदिरांना स्थान२०२५ मध्ये बांगलादेश सरकारने आपल्या चलनी नोटांच्या डिझाइनमध्ये क्रांतिकारी बदल केले आहेत. नव्या नोटांवरून 'वंगबंधू' शेख मुजीबुर रहमान यांची छायाचित्रे हटवण्यात आली आहेत. त्याऐवजी आता नोटांवर बांगलादेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्मारके आणि विशेषतः हिंदू व बौद्ध मंदिरांची चित्रे छापण्यात आली आहेत. देशाची राजकीय ओळख बदलून ती अधिक सर्वसमावेशक आणि सांस्कृतिक विविधतेने नटलेली आहे, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न यामागे असल्याचे सांगण्यात येते.

नोटा छपाईचे दुहेरी नियंत्रणबांगलादेशची मौद्रिक व्यवस्था 'बांगलादेश बँक' (मध्यवर्ती बँक) आणि सरकार यांच्यात विभागलेली आहे. १, २ आणि ५ टका या लहान मूल्याच्या नोटा थेट अर्थ मंत्रालयाकडून जारी केल्या जातात. तर १० टका आणि त्यावरील सर्व मोठ्या नोटा बांगलादेश बँक जारी करते. ही बँक महागाई नियंत्रण आणि चलनाची स्थिरता राखण्यासाठी जबाबदार असते.

वाचा - पगारदारांना मोठी लॉटरी! मुलांचे शिक्षण, एचआरए आणि जेवणाच्या भत्त्यात भरघोस वाढ

निवडणुका आणि अर्थव्यवस्थेवर परिणामगेल्या वर्षभरापासून बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनांमुळे आणि अस्थिरतेमुळे पदमा नदीच्या काठावरील या देशाची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. आजच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर जे नवीन सरकार सत्तेत येईल, त्यांच्यासमोर ढासळलेला 'टका' सावरणे आणि भारतासोबतचे व्यापारी संबंध पूर्ववत करणे हे सर्वात मोठे आव्हान असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladeshi Notes Feature Temples; Mujibur Rahman's Photo Removed: Tourist Benefit

Web Summary : Bangladeshi currency undergoes design changes, replacing Mujibur Rahman's image with temples. Indian tourists benefit from the rupee's strength against the Taka. Elections and economic instability pose challenges for the new government.
टॅग्स :बांगलादेशभारतीय चलनअर्थव्यवस्थानिवडणूक 2026