Join us  

भारताच्या शाश्वत विकासासाठी खाजगीकरण आवश्यक; डी. सुब्बाराव यांचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 7:13 PM

privatisation: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि माजी वित्तीय सचिव डी. सुब्बाराव यांनी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देडी सुब्बाराव यांचा खासगीकरणाला पाठिंबासरकारी कंपन्या विकण्यात तोटा नाही - डी. सुब्बाराव९ टक्के वाढीसाठी आणखी काही काळ लागणार - डी. सुब्बाराव

नवी दिल्ली : यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी निर्गुंतवणुकीकरणाच्या योजना सादर केली. त्यातून सरकार १.७५ लाख कोटी रुपये उभारणार असल्याचे सांगितले. मात्र, यानंतर केंद्र सरकारच्या या योजनेवर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच खासगीकरणालाही मोदी सरकारकडून प्रोत्साहन असल्याचे पाहायला मिळत आहे. खासगीकरणालाही विरोधकांकडून टीका केली जात असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि माजी वित्तीय सचिव डी. सुब्बाराव यांनी खाजगीकरण आवश्यक असल्याचे म्हटले आहे. (ex rbi governor d subbarao says privatisation route for putting india on sustainable growth path)

आताच्या घडीची परिस्थिती पाहता खाजगीकरण भारताला विकासाच्या मार्गावर परत नेण्यासाठी उपयुक्त आहे. याशिवाय या आधीच्या सरकारने सरकारी कंपन्यांमध्येच मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून ठेवली आहे, असेही डी. सुब्बाराव यांनी सांगितले. 

गुड न्यूज! आता घरबसल्या ऑर्डर करा; पेट्रोल-डिझेलची मुंबई व दिल्लीत होम डिलिव्हरी

सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

या पूर्वीच्या सरकारने सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सार्वजनिक क्षेत्रात गुंतवणुकीचे आवाहन केले आणि सार्वजनिक क्षेत्रच गुंतवणुकीचे केंद्र बनले. खाजगी क्षेत्रात फारशी गुंतवणूक नव्हती, उद्योजक पुढे येत नव्हते, खाजगी भांडवल नव्हते, म्हणून सरकारला अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी व्यवस्थेत राहणे आवश्यक होते, असे सुब्बाराव यांनी सांगितले. 

९ टक्के वाढीसाठी आणखी काही काळ लागणार

भारताने कोरोना संकटातून सावरण्यात यश मिळवले आहे. परंतु, आऊटपूट गमावणे आणि वाढती असमानता या मुख्य चिंता आहेत. ९ टक्के वाढीवर परतण्यासाठी अजून काही वेळ लागणार आहे. सरकारने आता निर्यातीवर भर देणे अत्यावश्यक असल्याचे मत सुब्बाराव यांनी व्यक्त केले आहे. 

Mi, Samsung नाही, तर 'या' कंपनीचा धडाका; ३ दिवसांत २,३०० कोटींची मोबाइल विक्री

सरकारी कंपन्या विकण्यात तोटा नाही

खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाले आहे. वित्तीय क्षेत्र विकसित झाले. सरकारने आता खाजगी उद्योगांसाठी जागा मोकळी करून देणे गरजेचे आहे. सरकारी कंपन्या विकणे तोट्याचे नाही, तर त्यामुळे सरकारकडून पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक होत असते. यामुळे शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक होत आहे, जे अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे, असे सुब्बाराव म्हणाले.

टॅग्स :केंद्र सरकारनिर्मला सीतारामन