Join us

पीएफचे पैसे आता डेबिट कार्डद्वारे काढता येणार; कधी लाँच होणार मोबाईल App? सरकारनं केलं स्पष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 11:58 IST

epfo mobile app and debit card : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO ​​मोबाईल अ‍ॅप ३.० आणि डेबिट कार्ड लाँच करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे.

epfo mobile app and debit card : देशातील कोट्यवधी नोकरदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO बाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या वर्षी मे-जूनपर्यंत EPFO ​​ग्राहकांना EPFO ​​मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आणि डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की सध्या EPFO ​​२.० वर काम सुरू असून संपूर्ण IT प्रणाली अपग्रेड केली जात आहे. हे काम जानेवारीच्या अखेरीस पूर्ण होईल. यानंतर मे-जूनपर्यंत EPFO ​​३.द ॲप येईल. ईपीएफओ सदस्यांना या अ‍ॅपद्वारे बँकिंग सुविधा मिळणार आहेत. विशेष म्हणजे यामुळे संपूर्ण यंत्रणा केंद्रीकृत होईल आणि क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया खूप सोपी होईल. म्हणजे पीएफचे पैसे आता एटीएमद्वारे काढता येणार आहेत.

आरबीआय आणि अर्थ मंत्रालय यांच्यात चर्चाकामगार मंत्रालयातील सूत्रांनुसार, EPFO ३​.० च्या माध्यमातून ग्राहकांना बँकेसारखी सुविधा देण्यासाठी आरबीआय आणि वित्त मंत्रालय यांच्यात चर्चा सुरू आहे. ग्राहकांना डेबिट कार्ड मिळणार असून ते एटीएममधून ईपीएफओचे पैसे काढू शकतील.

एकावेळी किती पैसे काढता येणार?एटीएम कार्ड मिळालं म्हणजे वापरकर्ते त्यांच्या योगदानाची संपूर्ण रक्कम काढू शकतील असं नाही. कारण, यासाठी मर्यादा निश्चित केली जाऊ शकते. चांगली गोष्ट म्हणजे ही रक्कम काढण्यासाठी पूर्वीप्रमाणे EPFO ​​ची परवानगी घेण्याची गरज भासणार नाही. सरकारच्या या उपक्रमाचा ईपीएफओ सदस्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण, पैसे काढण्यासाठी फॉर्म भरण्याच्या त्रासातून सुटका होणार असून कुठल्या कार्यालयात जावे लागणार नाही.

एनडीए सरकारमध्ये भरपूर रोजगाराच्या संधीकेंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, मोदी सरकारच्या २०१४-२४ च्या कार्यकाळात १७.१९ कोटी लोकांना नोकऱ्या मिळाल्या. हा आकडा यूपीए सरकारच्या कार्यकाळाच्या तुलनेत सुमारे ६ पटीने जास्त आहे. केंद्रीय मंत्री म्हणाले की, गेल्या एका वर्षात (२०२३-२४) देशात सुमारे ४.६ कोटी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. कृषी क्षेत्राबाबत ते म्हणाले की, यूपीए कार्यकाळात २००४ ते २०१४ या काळात रोजगारामध्ये १६ टक्क्यांनी घट झाली, तर एनडीएच्या कार्यकाळात २०१४ ते २०२३ या काळात त्यात १९ टक्क्यांनी वाढ झाली. 

टॅग्स :कामगारकेंद्र सरकारएटीएम